25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाप्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अल्पवयीन मुस्लीम तरुणाला अटक

प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अल्पवयीन मुस्लीम तरुणाला अटक

गुजरातमधील घटना; तरुणाच्या आई- वडिलांनी मागितली माफी

Google News Follow

Related

गुजरातमधून एका मुस्लीम अल्पवयीन तरुणाला आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. भगवान श्रीराम आणि सीतेबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याच्या कारणामुळे ही अटक करण्यात आली आहे. स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत अटक केली आहे.

गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात सादरा गावात एका अल्पवयीन मुस्लीम तरुणाने भगवान श्रीराम आणि माता सीतेबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. या घटनेच्या विरोधात शेकडो स्थानिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा ही काढला. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या घटनेनंतर गावात बंदची घोषणा देण्यात आली आहे.

संबंधित घटना २२ ऑक्टोबर रोजी झाली. सादरा गावातील १६ वर्षीय मुस्लीम तरुणाने इस्ट्राग्रामवर प्रभू श्री राम आणि सीता यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान पोस्ट केले होते. याची माहिती मिळताच गावात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर लोकांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. घटनेनंतर गावातील अंदाजे २०० ते ३०० लोक चिलोडा पोलीस ठाण्यात पोहचले. संतप्त स्थानिकांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून त्यांनी पोलिसांकडे स्क्रीनशॉट्स आणि इतर पुरावे सोपवले आहेत.

हे ही वाचा : 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीला दिलासा, २६५ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका!

अतुल भातखळकर ‘विजयी भव’…

देशात ठिकठीकाणी लव्ह जिहादची चार प्रकरणे

जस्टिन ट्रुडो राजीनामा द्या! स्वपक्षातील खासदारांनीच केली मागणी

“या घटनेमुळे आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोहचली आहे. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कुणीही अशी कृती करणार नाही,” असं स्थानिक रहिवाशी राजेश पटेल म्हणाले. चिलोडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक, पीआय परमार म्हणाले की, आम्ही प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, घटनेनंतर आरोपीच्या आई- वडीलांनी सरपंचांची आणि हिंदू संघटनांची माफी मागितली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अल्पवयीन आहे, त्याने अजाणतेपणी हा प्रकार केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा