जम्मू- काश्मीरमध्ये सध्या टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच जम्मू- काश्मीरमधील बारामुल्ला येथील न्यायालयाच्या पुरावा कक्षात स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, जम्मू- काश्मीरमधील बारामुल्ला येथील न्यायालयात पुरावा म्हणून आणलेल्या ग्रेनेडच्या स्फोटामुळे एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा देत गुरुवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बारामुल्ला न्यायालय संकुलातील पुरावा कक्षात दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “पुरावा म्हणून आणलेल्या ग्रेनेडचा मालखान्यात चुकून स्फोट झाला, त्यात एक पोलिस जखमी झाला.” तसेच पोलिसांनी नागरिकांना परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे. शिवाय जनतेने अफवांवर विश्वास ठेवून गोंधळ उडवून घेऊ नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
जस्टिन ट्रुडो राजीनामा द्या! स्वपक्षातील खासदारांनीच केली मागणी
उबाठाला मिळालेल्या जागा पाहता खरोखरच ते युतीत सडले का?
प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती, बहुधा लग्नात आहेर म्हणून आईने दिली असावी!
अचानक झालेल्या स्फोटानंतर न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा दल परिसरात शोध घेत आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर अधिकारी कोणत्याही संभाव्य धोक्याचा तपास करत आहेत. दरम्यान, काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना हा स्फोट झाल्याने जास्त गोंधळ निर्माण झाला होता.