शनिवारी अंधेरी पश्चिम येथील डेरावाला मॅन्शनजवळील भारदवाडी येथे चाळीतील काही खोल्या पाहण्यासाठी गेलेल्या चार रिअल इस्टेट एजंटांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांना विवस्त्र करण्यात आले आणि त्यांच्या गुप्तांगांना इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला. बेकायदा बांधकामांबाबत मुंबई महानगरपालिकेला माहिती देणार असल्याच्या संशयावरून परिसरातील मालमत्ताधारकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार एजंट भारदवडी परिसरात खोल्या तपासत असताना स्थानिक मालमत्ता मालकांना ते बीएमसीचे माहिती देणारे असल्याचा संशय आला आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेतले. चारही एजंटांना जवळच्या दुकानात नेऊन मारहाण केली, विवस्त्र केले आणि त्यांच्या गुप्तांगांना विजेचे झटके दिले. बेकायदा बांधकामांबाबत तक्रार करण्यापासून पीडितांना परावृत्त करता येईल, या आशेने आरोपींनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि विविध लोकांना व्हिडिओ फॉरवर्ड केले.
हे ही वाचा:
उबाठाला मिळालेल्या जागा पाहता खरोखरच ते युतीत सडले का?
सलमानसाठी धमकीचा संदेश पाठवणाऱ्या हुसैन शेखला ठोकल्या बेड्या
जस्टिन ट्रुडो राजीनामा द्या! स्वपक्षातील खासदारांनीच केली मागणी
ठाकरे पुन्हा तीच खेळी खेळतायत… |
दुसऱ्या दिवशी, चौघांनी डीएन नगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी एजंटांच्या तक्रारीच्या आधारे भारदवाडीतील रहिवासी सत्तार तुराक (५४), अझीझ तुर्राक (५०), आणि फिरोज तुराक (५३) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडितांना विजेचा शॉक देण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक बॅटरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.