23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामासलमानसाठी धमकीचा संदेश पाठवणाऱ्या हुसैन शेखला ठोकल्या बेड्या

सलमानसाठी धमकीचा संदेश पाठवणाऱ्या हुसैन शेखला ठोकल्या बेड्या

मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवला होता संदेश

Google News Follow

Related

मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला सलमान खानसाठीचा धमकीचा संदेश व्हॉट्सऍप मेसेजद्वारे प्राप्त झाला होता. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले होते. यानंतर काही दिवसांतचं मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सऍपवर पुन्हा एक दुसरा मेसेज आला होता. ज्यामध्ये धमकी देणाऱ्याने माफी मागीतली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, ‘चुकून मेसेज गेला आणि त्याबद्दल माफी मागतो’. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता आणि हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन झारखंडमधील असल्याचे समोर आले होते. अशातच आता या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. हुसैन शेख (वय २४ वर्षे) असे या आरोपीचे नाव आहे.

हुसैन हा झारखंड येथील जमशेदपूरमधील रहिवासी आहे. आरोपीने धमकीच्या संदेशात स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले होते. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सऍप मदत क्रमांकावर एक धमकीचा संदेश आला होता. त्यात लॉरेन्स बिश्नोईशी असलेले वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाहीत, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, असा इशारा दिला होता. याप्रकरणी १७ ऑक्टोबरला वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा : 

मविआचा ८५ चा फॉर्म्युला ठरला, उर्वरित जागांवर मित्र पक्षांसोबत चर्चा!

दहशतवाद-फंडिंगशी लढा देत, तरुणांना कट्टरतावादाकडे जाण्यापासून रोखायचय!

काँग्रेसने विधानसभेची जबाबदारी कर्नाटक-तेलंगणामधील लोकांवर दिली, बॉर्डर सील करा, कोटी रुपये येतील!

ब्रिगेडनेही साथ सोडली; नंगा नहाएगा क्या, निचोडेगा क्या?

तपासादरम्यान संदेश पाठवणारा झारखंडमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर वरळी पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. मोबाईल क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी हुसैन याचा माग काढला. चौकशीत त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन वरळी पोलीस मुंबईत पोहोचले आणि आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा