27 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषकाँग्रेसने विधानसभेची जबाबदारी कर्नाटक-तेलंगणामधील लोकांवर दिली, बॉर्डर सील करा, कोटी रुपये येतील!

काँग्रेसने विधानसभेची जबाबदारी कर्नाटक-तेलंगणामधील लोकांवर दिली, बॉर्डर सील करा, कोटी रुपये येतील!

शिवसेना सचिव किरण पावसकर यांची माहिती

Google News Follow

Related

विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामधील लोकांवर दिली असून येथून शेकडो कोटी रुपये महाराष्ट्रात येतील, अशी खळबळजनक माहिती शिवसेना सचिव व मुख्य प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिली. या दोन्ही राज्यांच्या बॉर्डर सील करण्यासाठी निवडणूक आयोगाला निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले. बुधवारी (२३ ऑक्टोबर) बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किरण पावसकर म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकीत पैशांचा खेळ होईल. महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातून नव्हे तर परदेशातूनही पैसा येत आहे. या पैशांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत याच दोन राज्यांतून महाराष्ट्रात पैसा आला होता. याचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करण्याची गरज आहे, असे पावसकर म्हणाले.

अमित ठाकरेंविरुद्ध माहीममध्ये उमेदवार उभा केल्याने किरण पावसकर यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता सोडणारे उबाठा किमान नातं तरी जपतील पण अमित ठाकरेंविरोधात माहिम उमेदवार जाहीर करुन उबाठाने नातं देखील जपले नाही, अशी घणाघाती टीका पावसकर यांनी केली. मी आणि माझ कुंटुंब बाकी सगळे गेले तेल लावत, असा उबाठाचा थाट असल्याची टीका त्यांनी केली.

हे ही वाचा : 

ब्रिगेडनेही साथ सोडली; नंगा नहाएगा क्या, निचोडेगा क्या?

शाही ईदगाह वादाची प्रकरणे एकत्रित करण्याच्या आदेशाविरुद्धचा मुस्लीम पक्षाचा रिकॉल अर्ज फेटाळला

इर्शाद ढाब्यावर थुंकून रोट्या बनवत होता, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

उबाठा-संभाजी ब्रिगेडमध्ये तुटेपर्यंत ताणले गेले! युती समाप्त

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा