उत्तर प्रदेशातील रामनगर येथील एका ढाब्यावर थुंकून रोट्या बनवल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अन्न सुरक्षा आणि औषध विभागाने तातडीने कारवाई केली. प्रशासनाने ढाबा जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सुधियामाळ गावाच्या रस्त्यालगत इर्शाद उर्फ इब्राहिम याचा ढाबा आहे. इर्शाद तंदूरमध्ये ठेवण्यापूर्वी रोटीमध्ये थुंकायचा असा आरोप आहे. काही स्थानिक लोकांना या घृणास्पद कृत्याची माहिती मिळाली, त्यांनी गुपचूप व्हिडिओ बनवला. या व्हिडीओमध्ये इर्शाद रोटीवर थुंकताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न सुरक्षा आयुक्त शैलेंद्र कुमार यांच्याही निदर्शनास आले.
हे ही वाचा :
टीएमसी खासदाराचा मुस्लीम मतांसाठी किती आटापिटा?
उबाठा-संभाजी ब्रिगेडमध्ये तुटेपर्यंत ताणले गेले! युती समाप्त
“महिना १०० कोटी खंडणीचे १०० सुलभ मार्ग” असे प्रकरण अनिल देशमुखांच्या पुस्तकात असेल का?
बारामती मधून अजित पवार, येवल्यातून भुजबळ, परळीतून मुंडे तर कागलमधून हसन मुश्रीफ!
अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून ढाब्याची पाहणी केली असता ढाब्याची नोंदणी नसल्याचे आढळून आले. यानंतर चालकाला ढाबा बंद करण्याची नोटीस देण्यात आली आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. घटनास्थळावरून खाद्यपदार्थही जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक चिरंजीव नाथ सिन्हा यांनी सांगितले की, आरोपी इर्शादला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ढाबा कोणत्या जागेवर सुरू होता, याची माहितीही प्रशासनाकडून घेतली जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
थूक वाली रोटी…
बाराबंकी में सड़क किनारे इरशाद उर्फ इब्राहिम का ढाबा है। इरशाद तंदूर में रोटी डालने से पहले थूक लगाता था।
कुछ लोगों ने चोरी छिपे वीडियो बना लिया।
जांच क बाद ढाबे को सीज कर दिया गया है। पुलिस ने इरशाद का हिरासत में लिया है। #barabanki #barabankipolice… pic.twitter.com/XZ5hy0XuAy
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) October 23, 2024