31 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024
घरधर्म संस्कृतीब्राह्मणांनी हिंदू म्हणून काम करत राहावे!

ब्राह्मणांनी हिंदू म्हणून काम करत राहावे!

अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे आवाहन, पिंपरीतील ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Google News Follow

Related

सुसंकृत, सुसंस्कारित व राष्ट्र हितासाठी सर्वाना उभे करणे हे आपले कर्तव्य आहे. ब्राह्मण ही माझ्यासाठी जात नसून एक आदर्श वृत्ती, एक संस्कृती आहे आणि म्हणून आपण हिंदू म्हणून काम करत राहणं आवश्यक आहे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृह येथे आयोजित ब्राह्मण सामर्थ्य संमेलनात ‘ब्राह्मण समाजाचे सामर्थ्य’ या विषयावर बोलताना केले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृह येथे नुकतेच ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भावेनजी पाठक, कुणाल टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.संमेलनात राहुल सोलापूरकर यांनी “ब्राह्मण समाजाचे सामर्थ्य” या विषयावर विचार मांडले, तर विशेष वक्ते सात्यकी सावरकर यांनी “हिंदुत्व” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मंत्रपुष्पांजलीने करून वसंतराव गाडगीळ यांच्या अलीकडील निधनाबद्दल त्यांना या प्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली.

राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले की, कृत,कारिता आणि अनुदित या महत्वाच्या तत्वांवर ब्राम्हण समाज काम करतो आहे. समाजातील सर्व क्षेत्रात समाज कार्यरत आहे. दुर्दैवाने गांधी हत्येनंतर जे काही अत्याचार सहन करावे लागले त्या मुळे ब्राह्मण समाज अत्यंत कोशात गेला. मूळ कर्तव्य विसरला. आजची पिढी तर आपण शिकूया व परदेशात जाऊया या मानसिकतेत असल्याचे दिसून येते.

संमेलनात सात्यकी सावरकर यांनी “हिंदुत्व” या विषयावर मार्गदर्शन करतांना “गेल्या काही वर्षातील किंवा शतकातील हिंदू विरोधी घटना बघता आता हिंदूंनी जाती मोडून एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले . “बटोगे तो कटोगे” हे योगी आदित्यनाथ यांचे विधान लक्षात घ्यावे.”हिंदू या शब्दाची व्याख्या सांगून पुढे ते म्हणाले, “सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे बंधुत्व आहे. समान रक्त, समान इतिहास आणि समान संस्कृती यांनी युक्त असे भावकीचे नाते आहे.” “सावरकरांनी जसे हिंदूंचे प्रबोधन केले तसे मुस्लिमांचे देखील केले त्यामुळे सावरकर हे मुस्लिम विरोधी नव्हते.”येत्या निवडणुकीत सर्वांनी शत प्रतिशत मतदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केले.

या प्रसंगी समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या कुंदन कुमारसाठे संस्थापक-अध्यक्ष थोरले बाजीराव पेशवे संस्था, मंजिरी मराठे कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,सुरेश साखळकर संस्थापक-अध्यक्ष बहुभाषिक ब्राह्मण संघ,संदीप डोळे मनोहर डोळे फाउंडेशन,अ‍ॅड. सन्मान आयाचित,अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर, किरणजी जोशी,उज्ज्वला गौड,वेदमूर्ती केशव दिवाकर दिगवेकर यांना सन्मानित करण्यात आले.

 

महेश दादा लांडगे यांच्या वतीने कार्तिक लांडगे यांनी ब्रह्म मित्र विशेष पुरस्कार या प्रसंगी स्वीकारला. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची अर्धमूर्ती आणि उपरणे देऊन सन्मानित करण्यात आले. मीडिया पार्टनर “न्यूज डंका” च्या वतीने शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त काढण्यात आलेल्या ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ या दिवाळी अंकाचे पुनश्च प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

हे ही वाचा:

‘बटेंगे तो कटेंगे’ आशयाचे मुंबईत लागले पोस्टर्स

बारामती मधून अजित पवार, येवल्यातून भुजबळ, परळीतून मुंडे तर कागलमधून हसन मुश्रीफ!

कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू

गँगस्टर छोटा राजनला जामीन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र चिपळूणकर तर आभार डॉ.सचिन बोधनी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, बहुभाषिक ब्राह्मण संघ ब्राह्मण सभा, राजगुरुनगर, महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा लोणावळा, अखिल ब्राह्मण संघ पुणे, विप्र फाउंडेशन पुणे,गोवर्धन ब्राह्मण संघ पुणे, परशुराम सेवा संघ पुणे, ब्राह्मण जागृती सेवा संघ, परशुराम सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र ब्राह्मण सभा , उत्तर भारतीय ब्राह्मण सभा पनवेल पेण व खोपोली, चित्पावन ब्राह्मण संस्था, शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण सभा पुणे, बोंड संस्था, युवोन्मेष परिवार पुणे, गौड ब्राह्मण संघटन, पुणे,. ब्राह्मण महासंघ, पुणे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र व आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण सभा खोपोली जुन्नर केंद्र आदी संस्थांचे सहकार्य लाभले.

या समारंभात ६०० लोकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात मंत्रपुष्पांजलीने झाली, आणि समारोप पसायदानाने झाला, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचे वातावरण मंगलमय झाले.

समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे:

१. श्री. कुंदन कुमारसाठे, संस्थापक-अध्यक्ष, थोरले बाजीराव पेशवे संस्था

२. सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

३. श्री. सुरेश साखळकर, संस्थापक-अध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण संघ

४. डॉ. संदीप डोळे, मनोहर डोळे फाउंडेशन

५. अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर, सत्यकी सावरकर यांच्यासोबत सावरकरांविरोधातील अपमानजनक वक्तव्यावर केस लढणारे

६. अ‍ॅड. सन्मान आयाचित, ब्राह्मण शेतकऱ्यांचे संघटन करणारे

७. श्री. किरणजी जोशी, पिंपरी चिंचवड आवृत्तीचे प्रमुख, ‘पुढारी’ वृत्तपत्र

८. सौ. उज्ज्वला गौड, लव्ह जिहाद या विषयावर कार्य करणाऱ्या

९. वेदमूर्ती केशव दिवाकर दिगवेकर

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा