कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच बंगळूरूमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बंगळुरूमधील हन्नूर येथे एक निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तविली जात असून एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १३ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले गेले आहे. यात आणखी सात लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी हन्नूर येथे इमारत कोसळली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाने घटनास्थळी धाव घेतली होती. सध्या पोलीस तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. या इमारतीला टाईल्सचा पुरवठा करणाऱ्या अहमदने सांगितले की, इमारतीमध्ये टाईल्स, काँक्रिट आणि प्लम्बिगचे काम करणारे जवळपास २० कामगार आहेत. अहदमने आरोप केला की, इमारतीचा पाया कच्चा होता, ज्यामुळे इमारत अचानक कोसळली.
#WATCH | Karnataka: Dog squad joins rescue operation at the site of the collapse of an under-construction building in the Horamavu Agara area in the eastern part of Bengaluru. The collapse occurred yesterday. At least one death has been reported. pic.twitter.com/e59US74oaE
— ANI (@ANI) October 23, 2024
पोलीस उपायुक्त डी. देवराज यांनी बुधवारी सांगितले की, एकूण १३ लोक ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर मृत्यू झालेल्यांची ओळख पटविण्यात आली आहे. अरमान (वय २६ वर्षे), त्रिपाल (वय ३५ वर्षे), मोहम्मद साहिल (वय १९ वर्षे), सत्य राजू (वय २५ वर्षे) आणि शंकर अशा पाच जणांचा मृतदेह बाहेर काढला गेला आहे. यातील अरमान, त्रिपाल आणि साहिल बिहारमधून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
“आमचे संबंध इतके घनिष्ठ की, कोणत्याही अनुवादकाची गरज नाही”
शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेला जामीन पण मुक्काम तुरुंगातच
पुण्यात व्होट जिहाद, २१ बांगलादेशींना अटक!
ठाकरे पुन्हा तीच खेळी खेळतायत…
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि बंगळुरू विकास मंत्री डीके शिवकुमार यांनी मंगळवारी रात्री दुर्घटना स्थळाला भेट दिली. त्यांनी सांगितले की, बृहत बंगळुरू महानगरपालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली आहे. तसेच त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बचाव कार्य संपल्यानंतर आम्ही कारवाईला सुरुवात करू.