महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या बाबतीत महायुतीने बाजी मारली असून भाजपाने आपले ९९ उमेदवार जाहीर केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ४५ उमेदवार मंगळवारी रात्री जाहीर झाले. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपले ४५ उमेदवार जाहीर केले. त्यात काही महत्त्वाच्या लढती सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत.
मनसेचे युवा नेते आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फे सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तूर्तास अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर असा सामना दिसतो आहे. दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो वरळीचा. उबाठा गटाचे आदित्य ठाकरे हे तिथून २०१९ला आमदार झाले आहेत. आता तेथून मनसेचे संदीप देशपांडे उभे राहणारर आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी लढत पाहायला मिळेल का याविषयी उत्सुकता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फेही ४५ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात स्वतः एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी येथून निवडणूक लढवणार आहेत. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. स्वतः उदय सामंत हे रत्नागिरीतून उभे राहात आहेत. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना दापोलीतून उमेदवारी मिळाली आहे. दर्यापूरमधून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेला जामीन पण मुक्काम तुरुंगातच
पुण्यात व्होट जिहाद, २१ बांगलादेशींना अटक!
ठाकरे पुन्हा तीच खेळी खेळतायत…
उज्जैनला पवित्र शहर म्हणून विकसित केले जाणार
आशीष जैस्वाल (रामटेक), संजय राठोड (दिग्रस), संतोष बांगर (कळमनुरी), अर्जुन खोतकर (जालना), अब्दुल सत्तार (सिल्लोड), संजय शिरसाट (संभाजीनगर), सुहास कांदे (नांदगाव), मनिषा वायकर (जोगेश्वरी पू), यामिनी जाधव (भायखळा), प्रकाश सुर्वे (मागाठाणे), मालेगाव बाह्य (दादाजी भुसे), शहाजी बापू पाटील (सांगोला), तानाजी सावंत (परांडा), शंभूराज देसाई (पाटण), दीपक केसरकर (सावंतवाडी) यांची नावे यादीत समाविष्ट आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईतून ६ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या 6 जणांमध्ये २ महिला उमेदवार आहेत.
मनसेचे काही उमेदवार असे –
कल्याण ग्रामीणमधूम राजू पाटील, माहीममधून अमित ठाकरे, भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिरीष सावंत, वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरमधून अविनाश जाधव, मुरबाड मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संगिता चेंदवणकर यांची बदलापूर अत्याचार प्रकरणात लावून धरण्यात निर्णायक भूमिका ठरली होती.
पुण्यात कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसर येथून साईनाथ बाबार, खडकवासलातून मयुरेश वांजळे, मागाठाणे येथून नयन कदम, बोरीवलीत कुणाल माईणकर, दहिसर मतदारसंघातून राजेश येरुणकर, दिंडोशीतून भास्कर परब, वर्सोवा मतदारसंघातून संदेश देसाई, कांदिवली पूर्वेतून महेश फरकासे, गोरेगाव येथून विरेंद्र जाधव, चारकोप दिनेश साळवी, जोगेश्वरी पूर्वेतून भालचंद्र अंबुरे, विक्रोळीत विश्नजित ढोलम, घाटकोपर पश्चिममधून गणेश चुक्कल, घाटकोपर पूर्वेतून संदीप कुलथे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.