33 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024
घरविशेषवक्फ विधेयक बैठकीत टीएमसी खासदाराने बाटली फोडली

वक्फ विधेयक बैठकीत टीएमसी खासदाराने बाटली फोडली

Google News Follow

Related

तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजप नेते अभिजित गंगोपाध्याय यांच्याशी जोरदार बाचाबाची करताना पाण्याची काचेची बाटली फोडली. बॅनर्जी यांच्या अंगठ्याला आणि तर्जनीला दुखापत झाली आणि त्यांना प्राथमिक उपचार करावे लागले, अशी माहिती पीटीआयने दिली.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि आप नेते संजय सिंह यांनी नंतर टीएमपी खासदाराला उपचारासाठी बाहेर नेले. भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती निवृत्त न्यायाधीश आणि वकिलांच्या गटाचे म्हणणे ऐकत असताना विरोधी सदस्यांनी या विधेयकात त्यांचा सहभाग काय असा सवाल केला.

हेही वाचा..

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी- बुच यांना हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमधून क्लीनचीट

पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या फैजानची गुर्मी उतरली, आता भारतमाता की जय, तिरंग्याला सलामी!

अभिनेता दर्शनने मागितला जामीन

एका प्रत्यक्षदर्शीने एएनआयला सांगितले की, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पाण्याची बाटली टेबलावर मारली त्यात त्यांनाच दुखापत झाली. सोमवारी वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ वर जेपीसीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली कारण विरोधी सदस्यांनी या कायद्यावरील “सल्लागार प्रक्रियेवर” प्रश्न उपस्थित केले आणि भाजप सदस्यांनी त्यांचा प्रतिवाद केला.

काही विरोधी सदस्यांनी सरकारवर हे विधेयक राजकीय कारणांसाठी आणल्याचा आरोप करत मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्याचा आरोप केला. त्यांनी विधेयक आणण्याच्या ‘तत्परते’वरही प्रश्न उपस्थित केले. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी विचारले आहे की अल्लाहच्या नावाने अस्तित्वात असलेल्या वक्फला राज्याने कायदेशीर मान्यता दिली आहे का?

वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात सुधारणा करणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे आवश्यक आहे असा युक्तिवाद करत भाजप सदस्यांनी विधेयकाचा बचाव केला आहे. वक्फ संयुक्त संसदीय समितीने दिल्लीत १५ बैठका घेतल्या आहेत, तर इतर शहरांमध्ये ५ बैठका झाल्या आहेत. वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ सुधारणा आणण्यासाठी डिजिटायझेशन, कठोर ऑडिट, पारदर्शकता आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या मालमत्तेवर पुन्हा दावा करण्यासाठी कायदेशीर यंत्रणा आणण्याचा प्रयत्न करते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा