पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दोन दिवसीय रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पुतिन यांच्या व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे.
आपल्या दौऱ्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी रशियाच्या कझानला रवाना होत आहे. भारत ब्रिक्सला खूप महत्त्व देतो आणि विविध विषयांवर विस्तृत चर्चेसाठी उत्सुक आहे. तिथल्या विविध नेत्यांना भेटण्यास उत्सुक आहे.” पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नरेंद्र मोदी १६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रशिया एन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून कझानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहे. भारत ब्रिक्समधील घनिष्ठ सहकार्याला महत्त्व देतो जे जागतिक विकासाचा अजेंडा, सुधारित बहुपक्षीयता, हवामान बदल, आर्थिक सहकार्य, लवचिक पुरवठा साखळी निर्माण करणे, लोकांशी जोडले जाणे या विषयांवर संवाद आणि चर्चेसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.
PM @narendramodi emplanes for Kazan, Russia. He will attend the BRICS Summit and meet several world leaders. pic.twitter.com/yspFOD0ahr
— PMO India (@PMOIndia) October 22, 2024
कझान येथे १६ वी ब्रिक्स शिखर परिषद रशियाच्या अध्यक्षतेखाली २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान होत आहे. त्यांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी ब्रिक्स सदस्य देशांच्या समकक्षांशी आणि कझानमध्ये निमंत्रित नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले, “ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटीसाठी बहुपक्षीयता बळकट करणे या विषयावरील शिखर परिषद प्रमुख जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नेत्यांना एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रदान करेल.”
हे ही वाचा:
‘चुकून पाठवला मेसेज’, ५ कोटीची मागणी करत धमकी देणाऱ्याने सलमानची मागितली माफी!
उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध
सीमावाद निवळणार; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मुद्द्यावरून भारत- चीनमध्ये झाला करार
ही भेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची या वर्षातील दुसरी रशिया भेट आहे. २२ व्या भारत- रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते जुलैमध्ये मॉस्कोला गेले होते जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. त्यांना त्यावेळी रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, मॉस्कोमधील क्रेमलिन येथे ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू द अपॉस्टलने’ही सन्मानित करण्यात आले होते.