मुंबईचे माजी पोलीस प्रमुख संजय पांडे यांच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका मुंबई पोलीस अधिकाऱ्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रवेश केला आहे. वृत्तानुसार, मुंबईचे माजी सहाय्यक पोलिस आयुक्त संजय जगताप शिवसेनेत (UBT) प्रवेश करणार असून ते मुंबईतील वडाळा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
वडाळ्यातून भाजपने आठ वेळा विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी दिली आहे. संजय पांडे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले तर मुंबई पोलिसांच्या निवासस्थानांचा मोठा भाग याच मतदारसंघात आल्याने कोळंबकर यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.वडाळा मतदारसंघात ४३ बीडीडी चाळी आहेत, त्यातील १४-१५ या मुंबई पोलिसांच्या मालकीच्या आहेत.
हे ही वाचा:
‘आंदोलकांनो अंतरवाली सराटीत येऊ नका, मला उमेदवार ठरवू द्या!
उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध
पुणे जिल्हा सर्वसाधारण विजेता, पुणे क्रीडा प्रबोधिनी उपविजेते
आझमगडमध्ये सामूहिक धर्मांतराचा डाव हाणून पाडला
सध्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक नवे चेहरे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. अलीकडेच, आयआरएस समीर वानखेडे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार असून धारावीतून निवडणूक लढवणार असल्याची बातमी आली होती