सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा प्रबोधिनी सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३-या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने १४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य पदकांसह एकूण ९७ गुणांसह स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद २ सुवर्ण ८ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह एकूण ४१ गुण मिळवताना क्रीडा प्रबोधिनी पुणे संघाने पटकावले.
स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मुलांमध्ये २ सुवर्णपदकांसह पुणे क्रीडा प्रबोधिनीच्या सिद्धेश घोरपडे याने तर मुलींमध्ये २ सुवर्ण आणि १ रौप्यपदकासह आभा सोमण यांनी पटकावले.
हे ही वाचा:
सत्तेचे विसर्जन करणारे तेच दोघे मविआ बुडवायला निघाले…
गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईत ४०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त!
उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध
आझमगडमध्ये सामूहिक धर्मांतराचा डाव हाणून पाडला
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्राचे अतिरीक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पीआय विलास राठोड, पीआय मिलींद झोडगे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अरविंद चव्हाण, स्पर्धा संचालीका दिपाली पाटील, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानीत मिनाक्षी शिंदे आदि हजर होते.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे –
इलीट मेन – इंडीव्युजल परस्युट ४००० मी. – सुवर्ण सुर्या थात्तु (पुणे ५.१२.४०), रौप्य विरेंद्रसींह पाटील (क्रीडा प्रबोधिनी ५.१५.९८), कांस्य विवान सप्रू (मुंबई शहर ५.२७.३४) इलीट वुमेन – इंडीव्युजल परस्युट ३००० मी. – सुवर्ण संस्कृती खेसे (पुणे ४.२७.७६) रौप्य सिया ललवानी (नाशीक ४.३४.७८) कांस्य स्नेहल शत्रुघ्न माळी (रायगड ४.४२.४०) मेन ज्युनिअर इंडीव्युजल परस्युट २००० मी. – सुवर्ण सोहम पवार (पुणे ४.०१.१०), रौप्य हरीश डोंबवले (४.११.४७) कांस्य समरजीत थोरबोले (दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे ४.२३.८३). वुमेन ज्युनिअर इंडीव्युजल परस्युट २००० मी. – सुवर्ण सिद्धी शिर्के (पुणे २.५१.७९), रौप्य स्नेहल माळी (रायगड ३.०१.५९), कांस्य आसावरी राजमाने (क्रीडा प्रबोधिनी पुणे ३.१७.३१), सब ज्युनिअर बॉईज इंडीव्युजल परस्युट २००० मी. – सुवर्ण सिद्धेश घोरपडे (२.२८.७५) रौप्य प्रणय चिनगुडे (२.४७.३६) कांस्य ओंकार गंधाळे (२.४७.४१ तिघे क्रीडा प्रबोधिनी पुणे) सब ज्युनिअर गर्ल्स इंडीव्युजल परस्युट २००० मी. – सुवर्ण प्राजक्ता सुर्यंवंशी (सांगली ३,०१.८६) रौप्य प्रेरणा कळके (३.०२.६०) कांस्य श्रावणी कासार (३.०४.१७ दोघी क्रीडा प्रबोधिनी पुणे) युथ बॉईज इंडीव्युजल परस्युट २००० मी. – सुवर्ण संस्कार घोरपडे (२.४९.५०), रौप्य अनुज गौंड ३.०५.५७) कांस्य अर्नव गौंड (३.०८.३४ तिघे पुणे) युथ गर्ल्स इंडीव्युजल परस्युट २००० मी. – सुवर्ण गायत्री तांबवेकर (३.१८.२९) रौप्य ज्ञानेश्वरी माने (३.२१.३८) कांस्य श्रुष्टी जगताप (३.३५.६७ तिघी पुणे) इलीट मेन स्प्रिंट मेन – सुवर्ण वेदांत जाधव (पुणे ११.५२) रौप्य वेदांत ताजणे (नाशीक ११.४७) कांस्य मंथन लाटे (ठाणे ११.७२) इलीट वुमेन स्प्रिंट मेन – सुवर्ण श्वेता गुंजाळ (पुणे १२.९८) रौप्य आदिती डोंगरे (१४.११) कांस्य आसानरी राजमाने (१४.९२ दोघी क्रीडा प्रबोधिनी पुणे) मेन ज्युनीअर स्प्रिंट – सुवर्ण साहील शेट्टे (पुणे ११.७९) रौप्य हरीष डोंबवले (१२.४५) कांस्य समरजीत थोरबोले (१२.४८दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे) ) वुमेन ज्युनीअर स्प्रिंट – सुवर्ण आभा सोमण (पुणे १३.४७) रौप्य आकांक्षा म्हेत्रे (जळगांव १५.१४) कांस्य ऋतीका शेजुळ (क्रीडा प्रबोधिनी पुणे १५.४४)