30 C
Mumbai
Monday, October 21, 2024
घरक्राईमनामाजम्मू काश्मिरात कामगारांची हत्या 'द रेझिस्टंट फ्रंट'ने घडवली!

जम्मू काश्मिरात कामगारांची हत्या ‘द रेझिस्टंट फ्रंट’ने घडवली!

द रेझिस्टन्स फ्रंट हा गट पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा

Google News Follow

Related

रविवारी संध्याकाळी जम्मू- काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात एका बांधकाम साइटवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा हल्ला एका बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याजवळ झाला. यानंतर देशभरात खळबळ उडाली असून या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या एका शाखेने घेतली आहे. सुरक्षा दलांकडून सध्या या हल्ल्यामागील दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

जम्मू- काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात कामगारांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) घेतली आहे. याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला. टीआरएफ प्रमुख शेख सज्जाद गुल हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असून त्याच्या सांगण्यावरून गटाच्या स्थानिक मॉड्यूलने प्रथमच काश्मिरी आणि गैर-काश्मीरींना एकत्रितपणे लक्ष्य करून हल्ला केला, अशी माहिती आहे. टीआरएफ काश्मीरमध्ये सक्रिय आहे आणि गेल्या दीड वर्षात काश्मिरी पंडित, शीख आणि गैर-स्थानिक लोकांना या गटाने लक्ष्य केले आहे. रविवारच्या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अहवालानुसार, डॉक्टर आणि कामगारांवर हल्ला करण्यात आलेले हे कामगार मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील गगनीरला सोनमर्गशी जोडणाऱ्या झेड-मोर बोगद्यावर काम करणाऱ्या बांधकाम टीमचा भाग होते. गांदरबलमधील बोगद्याच्या प्रकल्पावर काम करणारे मजूर आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीत परतले असताना अज्ञात दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

हे ही वाचा : 

एअर इंडियाच्या विमानातून उड्डाण न करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी

हिजबुल्लाची पळापळ, डेप्युटी सेक्रेटरी कासेम लेबेनॉनमधून सटकला

गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील टेकडीवर उभा राहिला ‘अनधिकृत भव्य दर्गा’

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी झालेल्या निःशस्त्र निष्पाप लोकांवर हल्ल्याचा तीव्र निषेध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याचा निषेध करत हे भ्याड कृत्य म्हटले आहे. या घृणास्पद कृत्यामध्ये सामील असलेल्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा