NDTV वर्ल्ड समिट २०२४, या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी सहभाग दर्शवत सभेला संबोधित केले. सोमवारी (२१ ऑक्टोबर) पार पडलेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील १२५ दिवसात केलेल्या कामाची यादी वाचून दाखविली. तसेच २०४७ पर्यंत विकसनशील भारताला विकसित बनवण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या ४-५ वर्षांचा काळ बघितला तर एक गोष्ट कॉमन राहिली, ती म्हणजे चिंता, भविष्याची चिंता. कोरोनाच्या काळात जागतिक महामारीचा सामना कसा करायचा याची चिंता होती. जसजसा कोविडचा प्रादुर्भाव वाढला, तसतशी जगभरातील अर्थव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली. कोरोनामुळे महागाई आणि बेरोजगारीची चिंता वाढली आहे. सर्वत्र चर्चाचा केंद्रबिंदू चिंताच आहे, तर भारतात कशाची चिंता होत आहे. या ठिकाणी चर्चा आहे ती म्हणजे ‘भारताच्या शताब्दीची’. जगात गोंधळ सुरु असताना, ‘भारत एक आशेचा किरण बनला आहे’.
जग चिंतेत बुडाले आहे तर भारत आशेचा संचार करत आहे. भारत आज एक विकसनशील देश आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे. आम्ही गरिबीची आव्हाने देखील समजून घेतो आणि प्रगतीचा मार्ग कसा मोकळा करायचा हे देखील आम्हाला माहित आहे. आमचे सरकार वेगाने धोरणे बनवत आहे, निर्णय घेत आहे आणि नवीन सुधारणा करत आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, आज आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला १२५ दिवस पूर्ण झाले आहेत. १२५ दिवसांचा अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छितो. ते पुढे म्हणाले, १२५ दिवसांत, आम्ही गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधली आहेत, ९ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर केले आहेत आणि १५ नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. ८ नव्या विमानतळाच्या शुभारंभाचे काम सुरु झाले आहे. याच काळात तरुणांसाठी २ लाख करोड रुपयांचे पॅकेट दिले आहे. अशा विविध उपक्रमांचा पाढा पंतप्रधान मोदींनी वाचून दाखवला.
हे ही वाचा :
जम्मू काश्मिरात कामगारांची हत्या ‘द रेझिस्टंट फ्रंट’ने घडवली!
एअर इंडियाच्या विमानातून उड्डाण न करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा, मोठा शस्त्रसाठा जप्त!
हिजबुल्लाची पळापळ, डेप्युटी सेक्रेटरी कासेम लेबेनॉनमधून सटकला
भारताने दूरसंचार आणि डिजिटल भविष्य, ग्लोबल सेमीकंडक्टर इकोसिस्टम, ग्लोबल फिन्टेक फेस्टिव्हल आणि नागरी विमान वाहतूक आणि अक्षय उर्जेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्येही भाग घेतला. हे कार्यक्रम भारतावरील जगाचा विश्वास दर्शवतात. २०४७ पर्यंत विकसनशील भारताला विकसित बनवण्याचे लक्ष्य बनवायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, एआयचे हे युगे आहे. जगाचे वर्तमान आणि भविष्य एआयशी जोडलेले आहे. पण भारताकडे दुहेरी एआयची ताकद आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, मोदींकडे दोन एआय कसे आले. जगाकडे एकच एआय आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण आपल्याकडे अजून एक एआय आहे, ते म्हणजे ‘महत्वाकांक्षी भारत’ (aspirational india).