नवी मुंबईतील विमानतळाच्या जवळ असलेल्या टेक़डीवरील अनधिकृत दर्गाचे फोटो आता व्हायरल होत असून अत्यंत मोक्याच्या जागी हा दर्गा उभा राहिला आहे. २०१२ ते २०२४ या काळात तिथे मोठे बांधकाम झाल्याचे फोटो प्रणव जाधव यांनी एक्सवर पोस्ट केले आहेत.
जाधव यांनी सॅटेलाइट इमेजच्या सहाय्याने हे अनधिकृत बांधकाम दाखवले असून २०१२ला तिथे केवळ एक मजार बांधण्यात आली आणि आता तिथे मोठे बांधकाम झालेले आहे, हे त्या प्रतिमेतून स्पष्ट होते. प्रारंभी १२ वर्षांपूर्वी केवळ एक दगड ठेवण्यात आला आणि नंतर त्याते मजार, दर्ग्यात रूपांतर झाले आहे.
हे ही वाचा:
मुंबई विमानतळावर २ किलो सोने जप्त!
भागलपूरच्या प्रसिद्ध शिवशक्ती मंदिरात तोडफोड, हिंदू समाजाकडून निदर्शने!
तिरुपती व्हीआयपी दर्शन फसवणूक : वायएसआर काँग्रेसच्या आमदारासह दोघांवर गुन्हा
वायनाडमध्ये नव्या हरिदास देणार प्रियांका गांधींना टक्कर!
जाधव यांनी दावा केला आहे की, हा एक एकरचा परिसर आहे. पांढऱ्या रंगाने रंगविलेले दगड झाडाखाली ठेवण्यात आले आणि नंतर त्याचे दर्ग्यात रूपांतर झाले. आता तिथे भिंत बांधण्यात आली असून पाण्याच्या टाक्या आहेत, गेस्ट हाऊस आहेत, पार्किंगची सोय आहे. हे सगळे कुणाच्या आशीर्वादाने झाले आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरकारला नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील टेकडीवर हे सगळे उभे राहत असताना त्याचे भान नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आता या जागेवर कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही नंतर तिथे तो केवळ मुस्लिमांचा भाग होईल, अशी भीतीही स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या वक्फ बोर्डाकडून लाटल्या जाणाऱ्या जमिनींचा मुद्दा समोर येत आहे. या अशा घटनांच्या माध्यमातून जमिनी हडप करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांवरही अशाच मजारी उभ्या करून तिथे त्यांचे दर्ग्यात रूपांतर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याविरोधात आंदोलनेही झालेली आहेत. आता नवी मुंबईतील या बांधकामाविरोधात सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.