एका विमानाने २,५०० मैलांचा (४,००० किमी) प्रवास करून चक्क फक्त एका प्रवाशाला आणलं. इस्रायलची सरकारी विमान कंपनी अल एल या विमान कंपनीच्या बोईंग ७३७ विमानाने तेल अविव (इस्रायलची राजधानी) ते कॅसाब्लँका (मोरोक्कोची राजधानी) असा प्रवास केला आणि तिकडून एका प्रवाशाला वैद्यकिय सुविधेसाठी इस्रायलमध्ये आणलं.
सामान्यतः बोईंग ७३७ या विमानात दोन वर्ग असतात. या दोन वर्गात मिळून साधारणपणे १६० प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र या विशिष्ट विमानात केवळ एकच प्रवासी होता, जो इस्रायली उद्योगपती असल्याचं मानलं जात आहे.
हे ही वाचा:
गुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू
भारत आयात करणार रेमडेसिवीरचे डोसेस
भारतातील दर दहापैकी एका रुग्णाला रिलायन्स निर्मित प्राणवायूचा पुरवठा
FlightRadar24 या संकेतस्थळावरू प्राप्त झालेल्या माहितीनुसार या विमानाने तेल अविवच्या बेन गुरियॉन विमानतळावरून १४.२० वाजता उड्डाण केले, आण कॅसाब्लँका येथे १७.२२ वाजता पोहोचले. या प्रवासासाठी केवळ सहा तासापेक्षा थोडाच जास्त अवधी लागला. या विमानाने आपल्या परतीच्या प्रवासाला १९.१० वाजता सुरूवात केली आणि तेल अविवला पहाटे ३ च्या सुमारास पोहोचले. या प्रवासासाठी पाच तासापेक्षा थोडाच जास्त अवधी लागला.
स्थानिक पत्रकार इटली ब्लुमेंटल याने केलेल्या ट्वीटनुसार, अल एल लवकरच एक हवाई अँब्युलन्स (LY5051) चालवणार आहे जी बेन गुरियॉन वरून कॅसाब्लँका, मोरोक्को शहरातून इस्रायली उद्योगपतीला इस्रायलमध्ये उपचारासाठी आणण्यासाठी थेट सेवा देणार आहे. हे विमान आज रात्री इस्रायलमध्ये उतरेल.
असा देखील दावा केला जात आहे की, हे विमान वैद्यकिय सेवा पुरवणाऱ्या मॅडॅसिस मेडिकल फ्लाईट या कंपनीतर्फे आयोजित करण्यात आले. ही कंपनी अत्यवस्थ रुग्णांना हवाई मार्गाने आणण्याची सेवा देते.
ब्लुमबेलने दिलेल्या अधिक माहितीनुसार या प्रवाशाने, या विमानाचा खर्च केला होता. ‘टाईम्स नाऊ न्यूज’ या वृत्तसंस्थेने या बाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.