25 C
Mumbai
Monday, October 21, 2024
घरविशेषप्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, पंतप्रधान मोदी हे 'महान राजकारणी'

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, पंतप्रधान मोदी हे ‘महान राजकारणी’

सत्य कधी तरी ओठावर येतेच, भाजप आमदार अतुल भातखळकरांचा टोला

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजकीय तापमान वाढू लागले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक मोठे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, एका पॉडकास्ट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चतुर्वेदी यांना त्यांच्या आवडत्या नेत्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यांना विचारण्यात आले की, आजचा महान राजकारणी कोण आहे? यावर उत्तर देताना प्रियांका चतुर्वेदींनी घेतलेल्या दिग्गज नेत्याचे नाव ऐकून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असेल. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील टोला लगावला आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांना ‘महान राजकारणी’ म्हटले आहे. त्या म्हणाल्या, पंतप्रधान मोदी लोकांना विशेषत: तरुण आणि महिलांना जोडण्यात तज्ञ आहेत. पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पक्षासाठी मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या असल्याचेही त्यांनी मान्य केले.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, सलग तिसऱ्यांदा केंद्रात भाजपचे सरकार बनवण्यात पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी त्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवले. सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपल्या बाजूने आणण्यात ते यशस्वी झाले.

हे ही वाचा : 

हमासच्या सिनवारचा नवा व्हीडिओ, बायकोकडे दिसली २७ लाखांची बॅग!

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या प्रवृत्तीबद्दल उपराष्ट्रपतींकडून चिंता

हैदराबाद पबमध्ये पोलिसांचा छापा

दिल्लीतील CRPF शाळेजवळ मोठा स्फोट!

दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रियांका चतुर्वेदी यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले , त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून सोशल मिडीयावर देखील बरीच चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत प्रियांका चतुर्वेदी यांना टोला लगावला आहे. ‘सत्य कधी तरी ओठावर येतेच’, असे अतुल भातखळकर म्हणाले.
अतुल भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, प्रियांका चतुर्वेदी यांना राजकीय नेता म्हणून ना उद्धव ठाकरे यांचे कौतूक आहे, ना राहुल गांधींचे, तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत, पण त्यांनी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले आहे. सत्य कधी तरी ओठावर येतेच.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा