25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरविशेषतोंडाला स्कार्फ बांधून सोफ्यावर धूळ खात बसलेल्या सिनवारला इस्रायलने ठोकले!

तोंडाला स्कार्फ बांधून सोफ्यावर धूळ खात बसलेल्या सिनवारला इस्रायलने ठोकले!

ड्रोनने याह्या सिनवारचे अंतिम क्षण टिपले, इस्रायलने जारी केला व्हिडीओ

Google News Follow

Related

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाला आहे. यानंतर इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी ड्रोन फुटेज प्रसिद्ध करत याह्या सिनवार याचे अंतिम क्षण टिपले असल्याचा दावा केला.

इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये सिनवार एका उद्ध्वस्त अपार्टमेंटमध्ये सोफ्यावर बसलेले, डोक्यासह संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकून घेतल्याचे दिसत आहेत. हल्ल्यामुळे इमारतीच्या भिंती उध्वस्त झालेल्या दिसत आहेत आणि सिनवारने स्वतःला झाकून घेतलेल्या कपड्यावर धुळाची चादर चढली आहे, आणि त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. फुटेजमध्ये इस्रायली ड्रोन त्याच्या जवळ येताच, तो ड्रोनवर हल्ला चढवताना दिसत आहेत. त्याच्या हातामध्ये लाकडी काठी असल्याचे दिसत आहे, तीच काठी ड्रोनवर भिरकावताना सिनवार दिसत आहे.

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांच्या म्हणण्यानुसार, फुटेज रेकॉर्ड केले तेव्हा सिनवारची ओळख फक्त एक सैनिक म्हणून झाली होती. यानंतर, सैन्याने इमारतीवर आणखी एक हल्ला केला, ज्यामुळे ती कोसळली आणि सिनवार मारला गेला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्या सैन्याने त्याला संपवले, आहे हागारी म्हणाले. दरम्यान, हमासने सिनवारच्या हत्येवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे ही वाचा : 

बहराइच घटनेवर तोंड बंद; अखिलेश यांचा हिंदूविरोधी डीएनए दिसतो!

५ कोटी न दिल्यास सलमानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट करण्याची धमकी

राजकोट पुतळा प्रकरण: पुतळ्याचे वेल्डिंग करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक

हमासचा म्होरक्या सिनवरच्या खोपडीचा इस्रायलने घेतला वेध

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा