28 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरविशेषउत्तराखंडमधील मदरशांमध्ये मिळणार संस्कृतचे धडे

उत्तराखंडमधील मदरशांमध्ये मिळणार संस्कृतचे धडे

उत्तराखंड मदरसा एज्युकेशन बोर्ड आणि संस्कृत शिक्षण विभाग यांच्यात होणार करार

Google News Follow

Related

उत्तराखंडमधील नोंदणीकृत मदरशांमध्ये लवकरच संस्कृत भाषा शिकवली जाणार आहे. उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुफ्ती शमून काझमी म्हणाले की, संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. बोर्ड आणि संस्कृत शिक्षण विभाग यांच्यात लवकरच यासंदर्भात एक सामंजस्य करार केला जाईल आणि पहिल्या टप्प्यात आधुनिक मदरशांमध्ये संस्कृतचे शिक्षण दिले जाणार आहे.

उत्तराखंड मदरसा एज्युकेशन बोर्डने (UMEB) संस्कृत विषय समाविष्ट करण्यासाठी औपचारिक प्रस्ताव तयार केला आहे आणि तो मंजूर झाल्यास, राज्यातील मदरशांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवले जाणार आहे. राज्यातील मदरशांमध्ये पूर्वीचं अरबी भाषा शिकवली जात असून बोर्डकडून पुढील शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मदरसा वेलफेअर सोसायटीने सहा वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील मदरशांमध्ये संस्कृत शिकवण्याची मागणी केली होती. मदरसा वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. सोसायटीने माजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील मदरशांमध्ये संस्कृत शिक्षकांनीही जावे, जेणेकरून तेथील अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश व्हावा, असे आवाहन केले होते, मात्र ते अव्यवहार्य असल्याचे सांगत त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मदरशांमध्ये संस्कृत शिकवण्यास नकार दिला होता. आता पुन्हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सध्या बोर्डाकडील नोंदणीकृत सर्व ४१६ मदरशांमध्ये NCERT अभ्यासक्रम लागू करण्यात आला असल्याची माहिती आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मदरशांमध्ये शिकणारी मुलंही इंजिनिअर, डॉक्टर, आयएएस, आयपीएस व्हावीत, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात मदरशांमध्ये शिकणारी मुले राष्ट्रीय कार्यक्रमांशी जोडली गेली आहेत.

हे ही वाचा : 

जस्टीन ट्रुडो अखेर झुकले; भारताविरोधात केवळ गुप्तचर यंत्रणांची माहिती, ठोस पुरावा नाही

न्या. संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

बाबा सिद्दिकी हत्या: मुख्य संशयित शुभम लोणकर विरोधात लुक आउट सर्क्युलर जारी

न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन् हातात तलवारीच्या जागी संविधान

उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळाने ४१६ मदरशांची नोंदणी केली आहे, जे एकत्रितपणे ७० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. शिवाय, अतिरिक्त मदरसे नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आहेत आणि येत्या काही वर्षांत ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारने मान्यता दिल्यानंतर हे मदरसे नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी संस्कृत शिक्षकांची भरती सुरू करतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा