24 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामाबाबा सिद्दिकी हत्या: मुख्य संशयित शुभम लोणकर विरोधात लुक आउट सर्क्युलर जारी

बाबा सिद्दिकी हत्या: मुख्य संशयित शुभम लोणकर विरोधात लुक आउट सर्क्युलर जारी

मुंबई गुन्हे शाखेने केली कठोर कारवाई

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत हत्या झाली. या प्रकरणात आता नवा अपडेट समोर आला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य संशयित शुभम लोणकर याच्या विरोधात मुंबई गुन्हे शाखेने लुक आउट सर्क्युलर (LOC) जारी केला आहे. शुभम लोणकरवर आरोप आहे की, त्याने या हत्येचा कट रचून आरोपींना आर्थिक मदत पुरवली आणि हत्येसाठी आवश्यक शस्त्रांची व्यवस्था केली.

बाबा सिद्दिकी यांची हत्या १२ ऑक्टोबर रोजी नर्मल नगर येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून करण्यात आली होती. या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता, ज्यात एक ऑस्ट्रेलियामधील Glock पिस्तूल, एक तुर्की पिस्तूल आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल वापरण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी ही सर्व शस्त्रे जप्त केली आहेत. प्रमुख संशयित शुभम लोणकर याने ही शस्त्रे उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याच आरोप आहे. शिवाय आर्थिक रसद पुरवल्याचाही संशय आहे. पोलिसांकडून शुभम लोणकर याचा शोध सुरू असून सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शुभम लोणकर हा नेपाळला किंवा इतरत्र देश सोडून पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलिसांनी लुकआउट नोटीस काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई गुन्हे शाखेने शुभम लोणकरवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून लुक आउट सर्क्युलर जारी केले आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शुभमने या हत्या प्रकरणात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने हत्येच्या कटात आर्थिक मदतीसह हत्यारांची व्यवस्था केली होती. या प्रकरणात त्याचा भाऊ प्रवीण लोणकर सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत आहे.

हे ही वाचा : 

न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन् हातात तलवारीच्या जागी संविधान

विमानांना वारंवार मिळणाऱ्या धमक्यांचा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून निषेध

लाडकी बहिण योजनेला बंद कराल तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच समजा!

सीमेपलीकडील दहशतवाद दोन देशांमधील व्यापार आणि संबंधांमध्ये अडथळा आणतात

पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसमुळे शुभम हा आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करताच त्याला अटक करण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे. शुभम लोणकरला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस सतर्क झाले असून त्याच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारवाईसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा