24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअवैध दारू प्यायल्याने आठ जणांचा मृत्यू!

अवैध दारू प्यायल्याने आठ जणांचा मृत्यू!

अनेकांना केले रुग्णालयात दाखल, बिहारमधील घटना

Google News Follow

Related

बिहारमधील सारण आणि सिवान जिल्ह्यात बेकायदेशीर मद्यपान केल्याने ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृतात सिवानमधील सहा जणांचा तर सारण जिल्ह्यात दोघांचा समावेश आहे. सर्व लोक अद्याप धोक्याबाहेर नसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

एकूण १५ जणांना सिवान येथील रुग्णालयात आणण्यात आले, त्यापैकी ३ जणांना पाटणा येथे रेफर करण्यात आले. सिवानचे जिल्हा दंडाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी एएनआयला सांगितले की, भगवानपूरचे एसएचओ आणि भगवानपूर पोलिस स्टेशनचे प्रोहिबिशन एएसआय यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनानुसार सारण जिल्ह्यातील मुशरख पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इब्राहिमपूर परिसरात ही घटना घडली. सारणचे जिल्हा दंडाधिकारी अमन समीर यांनी सांगितले की, त्यांना दोन लोकांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. शेजारच्या सिवानमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला पण प्रशासनाने केवळ चार मृत्यूंची पुष्टी केली आहे.

हे ही वाचा : 

विजेचा शॉक, नखे काढली, अन गोळ्यांनी छातीची चाळण केली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पहिले भाजपचे सक्रिय सदस्य!

भारतात प्रवेश करताना चार बांगलादेशींना अटक!

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!

जिल्हा प्रशासनाने निवेदनात म्हटले आहे की, संदिग्ध मृत्यूबद्दल अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस बुधवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत. अन्य दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नसले तरी, अवैध दारूचे सेवन करणाऱ्या लोकांनी दृष्टी कमी होणे, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या झाल्याची तक्रार केली. बिहार सरकारने अलीकडेच कबूल केले आहे की एप्रिल २०१६ मध्ये दारूबंदी झाल्यापासून राज्यात बेकायदेशीर दारू प्यायल्याने १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये बनावट दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या वाढीमुळे राज्यातील दारूबंदी संपुष्टात आणण्याची मागणी केली जात आहे. २०२२ मध्ये बिहारच्या सारण जिल्ह्यात बेकायदेशीर दारू पिऊन किमान ७३ लोक मरण पावले. सारणमधील डोईला आणि यदू मोट गावात ही दुर्घटना घडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषणा केली होती की, राज्यात दारूवर बंदी असल्याने पीडित कुटुंबांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा