24 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरराजकारणविधानसभेचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला मतदान तर २३ रोजी लागणार निकाल

विधानसभेचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला मतदान तर २३ रोजी लागणार निकाल

२८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार

Google News Follow

Related

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली असून महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना भेट दिली होती. तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर राज्यात वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. यामुळे राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून २८८ जागांवर मतदान होणार आहे. यातील २३४ जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ आणि २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा काळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. महाराष्ट्रात एकूण मतदार ९.६३ कोटी मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहे. यात २०.९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे. राज्यात १ लाख १५८ मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत.

मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे. सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व रिसोर्स वापरतील, असं राजीव कुमार म्हणाले. रांग लावण्यात येत असलेल्या ठिकाणी खुर्ची आणि बेंच ठेवणार असून यामुळे रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. ज्येष्ठ लोकांचा थकवा यामुळे दूर होईल, असंही ते म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी ८५ वर्षांच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडीओग्राफी केली जाते. जेणेकरून पुरावा राहील. शिवाय व्होटर हेल्पलाईन ऍपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे आहे, उमेदवार कोण आहे ते पाहू शकतात, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान

  • २२ ऑक्टोबर- अर्ज भरण्याची तारीख
  • २९ ऑक्टोबर- अर्ज मागे घेण्याची तारीख
  • ३० ऑक्टोबर- अर्ज छाणणी
  • ४ नोव्हेंबर- अर्ज मागे घेण्याची तारीख
  • २० नोव्हेंबर- मतदानाची तारीख
  • २३ नोव्हेंबर- निकाल

हे ही वाचा : 

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांनी घेतली शपथ!

बोपदेव बलात्कार प्रकरणातील आरोपी अख्तरला पकडले, यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा

मालाडमधील रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या मारहाणीत मनसे कार्यकर्ता दगावला

मदरशांत खरोखरच कुणी डोकावून पाहतंय का?

नांदेड लोकसभा पोट निवडणूक जाहीर

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचा विजय झाला होता. यानंतर काही दिवसांतचं २६ ऑगस्ट रोजी त्यांचे अकाली निधन झाले होते. यामुळे नांदेडच्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. अशातच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने नांदेडसाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून त्यासाठीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा