कॅनडाकडून वारंवार भारतावर करण्यात येत असलेल्या आरोपांमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अशातच भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावादरम्यान कॅनडाचे पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर निशाणा साधला असून त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बोर्डमन यांनी उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दींना परत बोलावण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे वर्णन दोन्ही देशांमधील मतभेदांचे स्पष्ट संकेत आहे. ते म्हणाले, “खलिस्तानी घटक या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत असून ते याला आपला पूर्ण विजय मानत आहेत आणि भारतावर हल्ला करत आहेत.”
भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढत असताना, कॅनडाचे पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी कॅनेडियन लोकांमधील सामान्य भावनांवर देखील भाष्य केले आणि यावर जोर दिला की बहुतेक कॅनेडियन लोक ट्रुडो यांच्या परिस्थिती हाताळण्याबद्दल अधिकाधिक निराश होत आहेत. बहुसंख्य कॅनेडियन या सरकारला कंटाळले आहेत. ते संस्थांवर विश्वास ठेवत नाहीत, मीडियाला विश्वासार्ह म्हणून पाहत नाहीत, जस्टिन ट्रूडो यांना विश्वासार्ह म्हणून पाहत नाहीत. ते म्हणाले की, कॅनडामध्ये नेतृत्व बदल होईपर्यंत भारत- कॅनडा संबंधांची स्थिती भारत सरकार रोखून ठेवेल. जर निवडणुका झाल्या तर नवीन सरकार भारतासोबतच्या संबंधांबाबत वेगळा दृष्टीकोन घेईल, असा अंदाज बोर्डमन यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
कॅनडा पोलिसांचा गंभीर दावा; भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत करतात काम
यूपी, आसाममध्ये मदरशांना कुलूप, महाराष्ट्रात टॉनिक! |
जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड!
मूकबधिरांना आत्मनिर्भर करणाऱ्या ‘टीच’ संस्थेच्या अमन शर्मांना केशवसृष्टी पुरस्कार
भारताने कॅनडातून आपले उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दींना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताने कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णयही घेतला आहे. भारत सरकारने त्यांना १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ पर्यंत भारत सोडण्यास सांगितले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाचे हे आरोप भारताने फेटाळून लावले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पुन्हा एकदा कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांच सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यानंतर भारताने कॅनडाच्या आरोपांना तथ्यहीन म्हणत कॅनडाला फटकारले आहे.