31 C
Mumbai
Wednesday, October 16, 2024
घरविशेषरतन टाटांची उद्धव ठाकरेंशी तुलना म्हणजे 'घरकोंबडा आणि पक्षीराज गरुड…'

रतन टाटांची उद्धव ठाकरेंशी तुलना म्हणजे ‘घरकोंबडा आणि पक्षीराज गरुड…’

भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका

Google News Follow

Related

शिवसेना उबाठा गटाचा शनिवारी (१२ ऑक्टोबर) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची आठवण काढत त्यांनी दिलेल्या एका सल्ल्याविषयीचा किस्सा सांगितला. दोघांना मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे, असे रतन टाटा तेव्हा म्हणाल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. रतन टाटांची उद्धव ठाकरेंशी तुलना म्हणजे घरकोंबड्याची आकाशात उंच उंच भराऱ्या घेणाऱ्या गरुडासोबत तुलना करण्यासारखे असल्याचे, अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, घरकोंबडा आणि पक्षीराज गरुड… हा माणूस दिवसेंदिवस केविलवाणा विनोदी वाटू लागलाय. स्वतःची तुलना रतन टाटांशी करतोय. जेआरडी टाटांनी जे काय मागे सोडले होते ते रतन टाटांच्या कर्तृत्त्वामुळे कैकपटींने वाढले. तुम्ही तर आधी पक्षाचे दुकान बनवले, नंतर टाळे लावण्याची व्यवस्थाही केली. बेशरमपणालाही काही मर्यादा असतात. रतन टाटांची उद्धव ठाकरेंशी तुलना म्हणजे घरकोंबड्याची आकाशात उंच उंच भराऱ्या घेणाऱ्या गरुडासोबत तुलना करण्यासारखे आहे. थोडी तरी लाज बाळगा, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’

‘जो सलमान, दाउदची मदत करणार त्याचा हिशोब करणार’

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!

बाबा सिद्दीकी हत्या, हल्लेखोरांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार, हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई!

दरम्यान, उद्धव ठाकरें कालच्या भाषणात रतन टाटा यांच्या भेटीचा उल्लेख करत म्हणाले, काही वर्षांपूर्वी रतन टाटा आमच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी घरी आले होते. बराच वेळ बोललो-गप्पा झाल्या, यानंतर निघताना मला म्हणाले, उद्धव एक लक्षात ठेव तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे. तुला शिवसेना प्रमुखांचा तर मला जे आर डी टाटांचा वारसा लाभलेला आहे. मी जेआरडी यांच्यानंतर टाटा समूहाचा कारभार हाती घेतला तेव्हा कोणताही निर्णय घेताना, मनात विचार यायचा की जे आर डी असते तर आज काय केले असते. त्यामुळे मी निर्णय घेवू शकत न्हवतो. पण, अचानक मला लक्षात आले की, अनेक वर्षे जेआरडींनी मला काम करताना बघितले आहे, त्यामुळे माझा वारसा रतनच पुढे घेवू जाऊ शकले तेव्हा तेव्हाच त्यांनी माझ्याकडे टाटा समूहाची धुरा दिली.

तसेच तुझेही तसेच आहे. जशी माझी निवड जेआरडींनी केली, तशी तुझी निवड शिवसेनाप्रमुखांनी केली आहे. त्यांनी बघितले आहे आणि तुझ्याकडे पक्षाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल ते कर, असे रतन टाटा यांनी मला सांगितले. त्यामुळेच मी मला योग्य वाटतात, तेच निर्णय घेतो. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा