23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषभारत सामर्थ्यशाली होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू

भारत सामर्थ्यशाली होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असून दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये संघ मुख्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांचे मुख्यालयात भाषण झाले. यावेळी मोहन भागवत यांनी देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक विषयांवर भाष्य केले.

मोहन भागवत म्हणाले की, दुर्बलता हा अपराध आहे, असे आवाहन हिंदू समाजाला केले. दुर्बलता म्हणजे अत्याचाराला निमंत्रण देणे आहे. त्यामुळे हिंदू समाजाने संघटन करणे आवश्यक आहे. सशक्त राहावे. केवळ बांगलादेशातच नाही तर भारतात पण हा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात पण समाजा- समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. फुटीरता आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आणि ते ओळखण्याचे आवाहन सरसंघचालकांनी भाषणावेळी केले.

पुढे ते असे म्हणाले की, “एका आव्हानाचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. कारण ते आव्हान फक्त संघ किंवा हिंदू समाजासमोर नाहीये. फक्त भारतासमोरही हे आव्हान नाही. जगभरात हे आव्हान निर्माण होत आहे. ते आपण समजून घ्यायला हवं. भारत पुढे जाऊ नये, अशी इच्छा अनेक देशांची आहे. ते वेगवेगळ्या प्रकारच्या चाली खेळतीलच. तसं होतही आहे. आजतागायत भारत सोडून इतर कोणत्या देशानं जगाच्या विकासाचा मार्ग निवडलेला नाही. आपण ते करतो,” असं मोहन भागवत म्हणाले. इतर देशांमध्ये विध्वंस घडवून आणणं, तिथली सरकारं पाडणं या गोष्टी जगात घडत असतात. आपल्या शेजारी बांगलादेशात काय घडलं? त्याची काही तात्कालिक कारणं असतीलही. पण एवढा मोठा विद्ध्वंस तेवढ्यानं होत नाही. दोन गोष्टी स्पष्ट आहेत. त्या विद्ध्वंसामुळे हिंदू समाजावर अत्याचाराच्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली. कुठे काही गडबड झाली की दुर्बलांवर आपला राग काढण्याची कट्टरपंथी वृत्ती आहे,” असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

बागमती एक्स्प्रेसला तामिळनाडूमध्ये अपघात; अनेक डबे घसरले

हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

दरम्यान, यावेळी बांगलादेश आणि पाकिस्तान यांची भारताविरुद्ध हातमिळवणी झाल्याचं सरसंघचालक म्हणाले. बांगलादेशात चर्चा असते की भारतापासून आपल्याला धोका आहे. पाकिस्तान आपला मित्र आहे. त्यामुळे पाकिस्तानला सोबत घ्यायला हवं. दोघं मिळून आपण भारताला रोखू शकतो असं त्यांना वाटतं. ज्या बांग्लादेश निर्मितीमध्ये भारताचं सहकार्य राहिलं, ज्या बांगलादेशबाबत आपण कधीही वैरभाव ठेवला नाही तिथे या चर्चा होत आहेत. या चर्चा कोण करतंय? अशा चर्चा तिथे व्हाव्यात हे कोणकोणत्या देशांच्या हिताचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या देशातही हे असं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. भारत सामर्थ्यशाली होऊ नये असे प्रयत्न चालू आहेत, असा इशारा मोहन भागवत यांनी दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा