31 C
Mumbai
Wednesday, October 16, 2024
घरविशेषनवी मुंबई विमानतळावर 'सी-२९५' आणि सुखोईचे यशस्वी लँडिग!

नवी मुंबई विमानतळावर ‘सी-२९५’ आणि सुखोईचे यशस्वी लँडिग!

२०२५ मध्ये विमानतळ नागरिकांच्या सेवेसाठी सुरु, मुख्यमंत्री शिंदे

Google News Follow

Related

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची घेण्यात आलेल्या चाचणी आज यशस्वी पार पडली. भारतीय वायुदलाच्या ‘सी-२९५’ लढाऊ विमानाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँण्डिंग केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख अधिकारी या धावपट्टी चाचणीवेळी उपस्थित होते.

वायुदलाचे ‘सी-२९५’ या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आल्यानंतर विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी टेक ऑफ केलं. लँडींग करणाऱ्या सी-२९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सिडकोच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. या विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहेत.

भारतीय हवाई दलाच्या विमानाचे यशस्वी लँडिग झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा :

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

अल जझीराचा तथाकथित पत्रकार देत होता भारतविरोधी घोषणा!

टाटा ट्रस्टची धुरा आता नोएल टाटांकडे

मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सिडको ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा