23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषटाटा ट्रस्टची धुरा आता नोएल टाटांकडे

टाटा ट्रस्टची धुरा आता नोएल टाटांकडे

टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

Google News Follow

Related

टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईत रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर टाटा ट्रस्टची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आता टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नोएल टाटा हे सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये या दोन्ही ट्रस्टचा मिळून ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची मूळ कंपनी आहे. दरम्यान, आज टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

रतन टाटांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटांचं नाव सर्वात पुढे होतं. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्नं केली होती. नवल टाटांचं पहिलं लग्न सूनी कमिश्रिएट यांच्याशी झालं होतं. सूनी आणि नवल दाम्पत्याला दोन मुलं होती. रतन आणि जिमी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी देखील लग्नं केली नाहीत. तर, नवल यांनी १९५५ मध्ये स्वित्झर्लंडमधील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा म्हणजे नोएल टाटा.

हे ही वाचा :

अल जझीराचा तथाकथित पत्रकार देत होता भारतविरोधी घोषणा!

नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू

मसुरीतील चहा थुंकी प्रकरण: मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसनला बेड्या!

महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक

नोएल टाटा हे गेल्या ४० वर्षांपासून टाटा समूहाचा भाग आहेत. सध्या ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. टाटा स्टील अँड टायटन कंपनी लिमिटेडमध्ये ते उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. नोएल टाटा ऑगस्ट २०१० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रेंटची उलाढाल ५०० मिलियन डॉलर्सवरून वाढून ३ बिलियन डॉलरवर गेली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा