26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामामहादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक

महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक

ईडीच्या विनंतीवरून जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे कारवाई

Google News Follow

Related

महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या विनंतीवरून जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. ईडीसह परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने ही कारवाई पार पडली. बेकायदेशीर बेटिंग आणि जुगाराच्या वेबसाइट्सचा समावेश असलेल्या या घोटाळ्यात जनतेची पाच हजार कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यूएई अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी अधिकृतपणे संवाद साधून सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक केल्याची माहिती दिली. ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यार्पण प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होईल आणि त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी यूएई प्राधिकरणाकडे विनंती केली आहे. एका आठवड्यात सौरभ चंद्राकर याला भारतात आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) अटकेची सूचना देण्यात आली आहे.

सौरभचे यूएईतील रास अल खैमाह येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. त्याने त्याच्या लग्नात सुमारे २०० कोटी रुपये खर्च केला होता. त्याने भारतातून नातेवाईकांना लग्न सोहळ्याला आणण्यासाठी खासगी जेट भाड्याने घेतले होते. तसेच लग्नात परफॉर्म करण्यासाठी त्याने सेलिब्रिटींसाठी मोठी रक्कम मोजली दिली होती, असा ईडीचा आरोप आहे. महादेव बेटिंग ऍप घोटाळा हा सुमारे पाच हजार कोटींचा आहे.

हे ही वाचा :

बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणकाम मजुरांवर गोळीबार; २० जण ठार

पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला देवी कालीचा मुकुट बांगलादेशातील मंदिरातून गेला चोरीला

इस्रायलकडून मध्य बेरूतमध्ये हवाई हल्ला; २२ ठार

‘दुर्मिळ रत्न हरपले’

महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा हा छत्तीसगडमधील भिलाई येथील व्यक्तींचा समावेश असलेल्या आणि यूएई तसेच भारतातील विविध राज्यांमधून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कारवायांचे एक जाळे आहे. २०२३ मध्ये छत्तीसगडमधील अनेक छामेमारीच्या कारवाईदरम्यान ईडीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या ऍपच्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलसह विविध खेळांवर तसेच जुगाराच्या इतर प्रकारांवर बेकायदेशीर बेटिंगचा व्यवहार चालत होता. संपूर्ण भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या ऍपने झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून अनेकांना आकर्षिक केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा