28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषरतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना

रतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना

देशातील प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा, मुकेश अंबानी, हर्ष गोयंका यांनी वाहिली आदरांजली

Google News Follow

Related

प्रसिद्ध उद्योजक, पद्मविभूषण आणि टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून शोक व्यक्त केला जात आहे. देशातील प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा, मुकेश अंबानी, हर्ष गोयंका यांनीही सोशल मीडियावर पोस्‍ट करत रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.

महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी रतन टाटा यांचा फोटो शेअर करत सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म एक्सवर पोस्‍ट केली आहे. “रतन टाटा यांची अनुपस्थिती मान्य करण्यास असमर्थ आहे. भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. रतन टाटा यांच्या जीवनाचा आणि कार्याचा आपण या ठिकाणी असण्याशी संबंध आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले असते. आपण फक्त त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. गुडबाय आणि गॉडस्पीड. तुम्‍हाला कधीच विसरले जाणार नाही. कारण महापुरुषांचा कधीच मृत्‍यू होत नाही,” अशा भावूक शब्दात आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी यांनीही रतन टाटा यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “आज भारतासाठी एक दुःखद दिवस आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे फक्त टाटा ग्रुपचेचं नुकसान झालं नसून प्रत्येक भारतीयाचं नुकसान झालं आहे. रतन टाटांच्या निधनामुळे भारताने एक सहृदयी व्यक्ती गमावली आहे. रतन टाटा यांनी भारताला जागतिक स्तरावर नेलं आणि जगातलं सर्वोत्तम भारतात आणलं. त्यांनी हाऊस ऑफ टाटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. १९९१ साली ते टाटा ग्रुपचे चेअरमन झाल्यानंतर ७० पटींनी त्यांनी हा उद्योग मोठा केला,” असं मुकेश अंबानी म्हणाले.

हे ही वाचा :

‘लाडली बहना योजने’विषयीचे वक्तव्य भोवले; संजय राऊतांवर गुन्हा दाखल

देशाने एक अनमोल ‘रतन’ गमावलं!

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा

पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन

प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी एंटरप्राईजेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “घड्याळाची टिक टिक थांबली आहे. टायटनचे निधन झाले. रतन टाटा सचोटीचे, नैतिक नेतृत्वाचे आणि परोपकाराचे उदाहरण होते. ज्यांनी व्यवसायाच्या जगावर आणि त्याहूनही पुढे एक अमिट छाप सोडली आहे. ते नेहमीच आमच्‍या आठणीत राहतील.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा