27 C
Mumbai
Thursday, October 10, 2024
घरविशेषठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकुट

ठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकुट

Google News Follow

Related

ठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेचे आयोजन ५ ते ७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत श्री मावळी मंडळ संस्था, क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य व ठाणे महानगर पालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आल्या होत्या. ह्या स्पर्धेसाठी श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे शतक वर्षानिमित्त निमित्त मैदान, मैदानावरील खर्च व बक्षिसांचा खर्च करण्यात आला.

ह्या स्पर्धेमध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या मुले १७ वर्षाखालील संघाने, मुली १७ वर्षाखालील संघाने व मुले १४ वर्षाखालील संघाने घवघवीत यश संपादन करीत श्री मावळी मंडळ हायस्कूलने विजयाचा तिहेरी मुकुट प्राप्त केला. ह्या तिन्ही संघांचे मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ह्या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुले व मुली, १४ वर्षाखालील मुले व मुली असे ४ गट होते. प्रत्येक गटात ठाण्यातील जवळपास ६० शाळांनी भाग घेतला होता.

१७ वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम समन्यामध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलने सहकार विद्या मंदिर कळवा शाळेचा १ डाव ३ गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळवले. ह्या सामन्यात श्री मावळी मंडळ हायस्कूलने एकूण ७ गडी टिपले तर सहकार विद्या मंदिर शाळेने ३ गडी टिपले. ह्या समन्यामध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या कु. आयुष सोनवणे ह्याने ३ मिनिटे संरक्षण केले, कु. स्वरान जाधव ह्याने १ मिनिटे संरक्षण केले व सोहम ठाकूर ह्याने नाबाद १ मिनिटे संरक्षण करून शाळेस विजयी करण्यात योगदान दिले.

१७ वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम समन्यामध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलने न्यु कळवा हायस्कुलचा १ डाव २ गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळवले. ह्या सामन्यात श्री मावळी मंडळ हायस्कूलने एकूण ५ गडी टिपले तर न्यु कळवा हायस्कुलने ३ गडी टिपले. ह्या समन्यामध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या संस्कृती जाधव, अद्विका चव्हाण आणि अंतरा कदम ह्यांनी अष्टपैलू खेळी करून शाळेस विजयी केले.

तसेच, १४ वर्षाखालील मुलांच्या गटात श्री मावळी मंडळ हायस्कूलने सर्व सामने एकतर्फी विजयी होऊन स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. अंतिम समन्यामध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलने लक्ष्मी विद्यालयाचा १ डाव ५ गुण राखून एकतर्फी विजेतेपद मिळवले. ह्या सामन्यात श्री मावळी मंडळ हायस्कूलने एकूण ११ गडी टिपले तर लक्ष्मी विद्यालयाने ५ गडी टिपले. ह्या समन्यामध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या अभिराज वाळंज ह्याने नाबाद २ मिनिटे संरक्षण करून समन्यामध्ये ३ गडी बाद करून अष्टपैलू खेळी केली, पार्थ मायनांक ह्याने २ मिनिटे संरक्षण केले व भार्गव शिंदे ह्याने १ मिनिटे संरक्षण करून १ गडी बाद करत आपल्या संघास विजय संपादन करून दिला.

हे ही वाचा:

संजय राऊतांनी काँग्रेसला काढले चिमटे, हरियाणातील पराभवावर टीका

आरबीआयकडून दिलासा; सलग दहाव्यांदा रेपो रेट जैसे थे स्थितीत

काँग्रेस, पवार, ठाकरेंनी शस्त्रे परजली होती, पण आता सगळे चिडीचूप!

स्त्री शक्तीचा जागर: झाशीची राणी लक्ष्मीबाई

श्री मावळी मंडळ हायस्कूलचे राज्यस्तरीय प्रशिक्षक श्री प्रणय कमले हे त्यांचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली श्री मावळी मंडळ हायस्कूलने बरेच विजय संपादन केले आहे. त्यांचे देखील अभिनंदन.

स्पर्धेच्या समारोप रीमा देवरुखकर (क्रीडा अधिकारी ठा. म.पा. व छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेती) ह्यांच्या हस्ते झाला. त्यांच्या सोबत संस्थचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, विश्वस्त रवींद्र आंग्रे, विश्वस्त केशव मुकणे, कार्यकारिणी सदस्य भगवान शिंदे, नरेंद्र पाठक (श्री मावळी मंडळ हायस्कूलचे CEO), रोशन वाघ (श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या माध्यमिक विभागाचे मुख्य), आदिती हवालदार (श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचे मुख्य) आणि नीता मिरकर (श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्य) हे उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा