25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषआम्ही देण्याची भाषा तरी करतो, तुमची परंपरा तर वसुलीची!

आम्ही देण्याची भाषा तरी करतो, तुमची परंपरा तर वसुलीची!

भाजप आमदार अतुल भातखळकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Google News Follow

Related

महायुती सरकारने राज्यातील गोरगरीब महिलांच्या सशक्ती करणासाठी ‘लाडकी बहिण योजने’ची सुरुवात केली. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत, त्यानुसार आतापर्यंत अनेकांच्या खात्यावर योजनेची रक्कम जमा झाली आहे, उर्वरित महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. सरकारच्या योजनेमुळे राज्यातील महिलांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

मात्र, योजनेच्या रकमेवरून उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आणि म्हणाले, १५ लाखांवरून पंधराशेवर आले, सरकार ही निवडणूक हरणार आहे हे लक्षात आल्याने त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेवर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. ‘आमची भाषा देण्याची तरी आहे, तुमची परंपरा फक्त वसूलीची आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

स्त्री शक्तीचा जागर: त्यागाचे रूप माई सावरकर

मायक्रो आरएनएच्या शोधासाठी अमेरिकेचे व्हिक्टर ऍम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार

झाकीर नाईकची व्हिडीओवर संतापाची लाट

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!

‘लाडकी बहिण योजने’वर आदित्य ठाकरे म्हणाले, जे सरकार पहिला १५ लाख सांगत होती, आता ती पंधराशेवर आली आहे, पुढे दीडशे रुपये देईल. मात्र, आमचे सरकार आल्यानंतर या रकमेत वाढ करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या टीकेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत म्हणाले, आमची भाषा देण्याची तरी आहे, तुमची परंपरा फक्त वसूलीची आहे. या वसूलीमध्ये वडापाव वाले, फेरीवाले सुद्धा सुटले नसल्याचे म्हणत अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा