31 C
Mumbai
Sunday, October 6, 2024
घरविशेषसार्वजनिक आक्रोशानंतर मोस्ताकीनला अटक

सार्वजनिक आक्रोशानंतर मोस्ताकीनला अटक

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलताली गावातील लोक शनिवारी (५ ऑक्टोबर) रस्त्यावर उतरल्यानंतर काही तासांनी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी मोस्ताकीन सरदार नावाच्या मुलाला अटक करण्यात आले आहे. बरुईपूर जिल्ह्याचे एसपी पलाश चंद्र ढाली यांनी या घटनेला दुजोरा दिला. मोस्ताकीनने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्याने मुलीची हत्या केल्याचे मान्य केले आहे, परंतु तिच्यावर बलात्कार केल्याचे नाकारले आहे. आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. बारूईपूरचे एसपी पलाश चंद्र ढाली यांनी सांगितले. मीडियाशी बोलताना मुलीच्या वडिलांनी आरोपी मोस्ताकीनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

हेही वाचा..

मिरारोडमध्ये ख्रिश्चनांच्या कार्यक्रमात बाथ टब! सुरू होते धर्मांतरण?; बजरंग दल, विहिंपने डाव उधळला

ममता बॅनर्जी सरकार अपयशी

‘महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांना खुपला’

हिमालयात अडकलेल्या ब्रिटिश, अमेरिकेन महिलांची सुटका

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पीडितेची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिला तिच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या कालव्यात फेकून दिले. स्थानिक पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला त्रास दिल्याचा आणि वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ही ११ वर्षीय मुलगी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रात्रीपासून बेपत्ता होती. ती शिकवणी वर्गासाठी गेली होती, मात्र घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह कालव्यात सापडला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. जयनगर आणि कुलटाळी येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिस ठाण्यावर हल्ला करून ते पेटवून दिले.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये महिला आंदोलक लाठ्या, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट करत निदर्शने करताना दिसत आहेत. तर काहीजण रागाच्या भरात दुचाकी आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करताना दिसले. कुलटाळी येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा