29 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरक्राईमनामादहशतवादी यासिन मलिक म्हणतो बंदूक सोडली, आता मी गांधीवादी!

दहशतवादी यासिन मलिक म्हणतो बंदूक सोडली, आता मी गांधीवादी!

यूएपीए कोर्टात दिले प्रतिज्ञापत्र

Google News Follow

Related

दिल्लीच्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला जम्मू आणि काश्मीर मुक्ती मोर्चा- वायचा (JKLF- Y) यासीन मलिक त्याने युएपीए न्यायाधिकरणासमोर दावा केला आहे की, आपण आता गांधीवादी असून १९९४ मध्ये आपण शस्त्रे खाली ठेवली. तेव्हापासून हिंसा सोडल्याचा दावा करत त्याने यूएपीए कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यासीन मलिक याने जम्मू- काश्मीरला स्वतंत्र देश बनवण्यासाठी यापूर्वी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी दहशतवादाचा मार्ग सोडून गांधीवाद स्वीकारल्याचा दावा यासीन मलिक याने केला आहे. यासिन मलिकने १९८८ मध्ये जम्मू- काश्मीर लिबरेशन फ्रंट- वाय म्हणजेच JKLF- Y ची स्थापना केली होती. या संघटनेच्या माध्यमातून १९९० मध्ये श्रीनगरच्या रावळपुरा येथे दहशतवाद्यांसह भारतीय हवाई दलाचे चार जवान शहीद झाले होते. यासीन हा या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी ओळखले होते. तसेच एनआयए कोर्टाने यासीन मलिकला दहशतवादी फंडिंगच्या आरोपात दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. द

रम्यान, यूएपीए न्यायाधिकरणाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, मलिक याने दावा केला की, ‘संयुक्त स्वतंत्र काश्मीर’ स्थापन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याने १९९४ मध्ये JKLF- Y च्या माध्यमातून सशस्त्र संघर्षाचा मार्ग सोडला आहे. आता गांधीवादी पद्धतीचा अवलंब करत आहे. त्याच मार्गाने त्याचे आंदोलन गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे.

यासीनचे प्रतिज्ञापत्र गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाले आणि गुरुवारी गॅझेटमध्ये प्रकाशित झालेल्या यूएपीए न्यायाधिकरणाच्या आदेशात त्याचा उल्लेख करण्यात आला. १९६७ च्या बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत JKLF-Y ला ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्याचा निर्णय पुढे कायम ठेवण्यात आला.

हे ही वाचा..

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना गरीब करण्यात कोणतीही कसर सोडली नाही

उत्तर लेबनॉनवर इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यासह कुटुंबीय ठार

एससीओमध्ये भारत-पाकिस्तान चर्चा नाकारली

तिरुपती देवस्थानच्या प्रसादाबद्द्ल भाविकांकडून समाधान

यासीन मलिक काश्मीरच्या राजकारणात सक्रिय होता. तरुणांना भडकावण्यात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग मानला जातो. २०१९ मध्ये केंद्र सरकारने JKLF वर बंदी घातली होती. यासीन मलिकने १९९० मध्ये हवाई दलाच्या ४ जवानांची हत्या केल्याची कबुलीही दिली होती. मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा