23 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरदेश दुनियासंयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना इस्रायलमध्ये बंदी

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना इस्रायलमध्ये बंदी

इस्रायलचे परराष्ट्रमंत्र्यांनी केली घोषणा; सरचिटणीस ‘नॉन ग्राटा’ म्हणून घोषित

Google News Follow

Related

पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून दिवसेंदिवस इस्रायल अधिक आक्रमक भूमिका घेत आहे. हमास आणि हिजबुल्ला पाठोपाठ आता इराणनेही इस्रायल विरोधात आघाडी उघडली आहे. इराणने इस्रायलवर नुकतीच क्षेपणास्त्र डागली होती. यानंतर याचे परिणाम इराणला भोगायला लागणार असा कठोर इशारा इस्रायलने जाहीरपणे इराणला दिला आहे. अशातच आता इस्रायलने थेट संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीसांवर पक्षपाताचा आरोप करत इस्रायलमध्ये येण्यास बंदी घातली आहे.

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कॅट्झ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ऍटोनियो गुटेरेस यांना इस्रायलने ‘नॉन ग्राटा’ म्हणून घोषित केले आहे. म्हणजे अशी व्यक्ती जिला कोणताही आदर किंवा स्वागत होणार नाही. त्यांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर काही तासात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

इस्रायलने हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह आणि इतर कमांडरना मारल्याच्या प्रत्युत्तरात इराणने इस्रायलवर सुमारे १८० क्षेपणास्त्रे डागली यावर भारताने म्हटलं की, सर्व बाजूंनी संयम बाळगावा, संघर्ष आणखी पसरू नये, यासाठी प्रयत्न करावेत. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबद्दल भारत अत्यंत चिंतेत आहे, असे स्पष्ट करीत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केले आहे. या भागातील सुरक्षा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले.

हे ही वाचा:

दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ – वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्

भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला

डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन स्फोट

इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करून चूक केलीये, आता परिणाम भोगा

यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ऍटोनियो गुटेरेस यांनी निषेध नोंदवला नव्हता. तसेच हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. इस्रायल आपल्या नागरिकांचे संरक्षण आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा राखणे सुरू ठेवेल, असेही इस्त्रायलने स्पष्ट केले आहे. दरम्यान इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेडची यादी जाहीर केली आहे. गुप्तचर संस्थेने हिब्रूमध्ये जारी केलेल्या धमकीमध्ये, इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू आणि त्यांचे इतर प्रमुख संरक्षण अधिकारी यांची नावे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा