28 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरविशेषसंभाजी राजेंच्या संघटनेला 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून मान्यता!

संभाजी राजेंच्या संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता!

'सप्तकिरणांसह पेनाची निब' पक्षाचे चिन्ह

Google News Follow

Related

छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. संभाजी राजेंनी स्वतः ट्वीटकरत याची माहिती दिली. दरम्यान, संभाजी राजेंच्या संघटनेला पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

संभाजी राजे ट्वीटकरत म्हणाले, आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.

हे ही वाचा : 

माओवाद्यांशी संबंध असलेल्या प. बंगालमधील १२ ठिकाणांवर छापेमारी

रशिद सिद्दिकी बनला शंकर शर्मा अन आयेशा बनली आशा; १० वर्षे भारतात होते वास्तव्याला

अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी

पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठींबा कायम असेल

ते पुढे म्हणाले,  याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित! जय स्वराज्य!, असे संभाजी राजेंनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा