31 C
Mumbai
Thursday, October 3, 2024
घरविशेषराज्यात गायी राज्यमाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान

राज्यात गायी राज्यमाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान

मंत्रिमंडळाची मंजुरी

Google News Follow

Related

राज्यात आणि देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना यापुढे राज्यमाता- गोमाता म्हणून घोषीत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या खात्यामधील एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्याकडे अगदी सुरुवातीपासून गायीला खूप महत्व आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक आणि आर्थिक महत्व असल्यामुळे गायीला आपण कामधेनु म्हणतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देशी गायींच्या जाती आहेत.

हेही वाचा..

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!

मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर अमित शहांचा प्रहार !

हरियाणा काँग्रेसकडून आणखी १० नेत्यांची हकालपट्टी

देवणी, लालकंधारी, खिल्लार, डांगी, गवळाऊ अशा जाती आहेत. यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस “राज्यमाता- गोमाता” घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा