25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषमोदींना सत्तेतून हटवणार नाही, तोपर्यंत जिवंत राहीन!

मोदींना सत्तेतून हटवणार नाही, तोपर्यंत जिवंत राहीन!

मल्लिकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र झाली आहे. भाजप आणि काँग्रेससोबतच स्थानिक पक्षांनीही पूर्ण ताकद लावली आहे. रविवारी (२९ सप्टेंबर) तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सभेला संबोधित केले. जोपर्यंत मोदींना सत्तेवरून हटवणार नाही तोपर्यंत मरणार नसल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील जसरोटा येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करत असताना खर्गे यांची तब्बेत ठीक नसल्याचे दिसून आले. ते म्हणाले, मोदींना सत्तेतून हटवल्याशिवाय मी मरणार नाही. राज्याचा दर्जा देणार असल्याचे मी पहिल्या पासूनच बोलत आहे आणि त्यासाठी आम्ही जरूर लढू.

ते पुढे म्हणाले, पुढे काहीही होवो, मी असेच सोडणार नाही. आता तर मी ८३ वर्षांचा आहे, इतक्या लवकर मी मरणार नाहीये. जोपर्यंत मोदींना सत्तेतून हटवणार नाही तोपर्यंत मी जिवंत राहीन, तुमचे ऐकेन आणि तुमच्यासाठी लढेन, असे खर्गे म्हणाले.

हे ही वाचा : 

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान!

उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध, खोदलेला खड्डा बुजवला!

शहरातील कामगारांच्या गरिबीचा स्तर जाणून घेण्यासाठी होणार सर्व्हे

काँग्रेसच्या सभांमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १ ऑक्टोबरला पार पडणार आहे. यासाठी आजच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यापूर्वी दोन टप्प्यातील मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी सुरक्षा दल-पोलीस प्रशासनाची सुरक्षा कडक ठेवण्यात आली आहे. यासह मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा