24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषआरोपी असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी राहुल गांधी आहेत का ?

आरोपी असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी राहुल गांधी आहेत का ?

सुधांशू त्रिवेदी यांचा सवाल

Google News Follow

Related

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) साईटमध्ये एफआयआरमध्ये नाव असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठीशी राहुल गांधी उभे आहेत का ? असा सवाल करून भारतीय जनता पक्षाने गांधी यांना फटकारले आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मुडा प्रकरणावरून ही टिपण्णी केली.

विद्यमान मुख्यमंत्र्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी बनवण्याची ही दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे काँग्रेसचा भ्रष्ट चेहरा उघड झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कथित मुडा घोटाळ्याच्या संदर्भात शुक्रवारी गुन्हा दाखल केलेल्या सिद्धरामय्या यांच्यावर भाजपने हल्ला चढवला आहे.

हेही वाचा..

हिजबुल्लाच्या प्रमुखाच्या हत्येची चर्चा, इराणच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षित स्थळी हलवले!

वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात समाधानाच्या क्षणासाठी तीर्थदर्शन योजना

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संबोधले नाच-गाण्याचा कार्यक्रम!

कुलगाममध्ये दोन दहशतवादी टिपले, एके-४७सह दारूगोळा जप्त!

काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुडा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबाने म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीमधील जमीन आणि सरकारी अधिकाराचा गैरवापर करून ज्या प्रकारे प्रचंड संपत्ती कमावली आहे, त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना प्रथम क्रमांकाचा आरोपी बनवण्यात आले आहे, असे त्रिवेदी यांनी म्हटले आहे.

भ्रष्ट कारभाराचा आरोप असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत का, असा सवाल करत भाजप नेत्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुडाने सिद्धरामय्या यांच्या पत्नीला म्हैसूर शहरात बेकायदेशीरपणे १४ जागा दिल्याचा आरोप आहे. सिद्धरामय्या यांनी भाजपवर सूडाचे राजकारण केल्याचा आरोप करत राजीनामा देण्यास नकार दिला आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंडेनबर्ग अहवाल वाद आणि मणिपूर हिंसाचारावर प्रश्न केला.

नरेंद्र मोदी हिंडेनबर्ग (रिपोर्ट) बद्दल का बोलत नाहीत? ते मणिपूरला का गेले नाहीत ? असे मुद्दे राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, “त्यांना राजीनामा द्यावा लागेल, दुसरा पर्याय नाही. ते राज्यपालांना कोंडीत पकडण्याचा आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते अस्वीकार्य आहे. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपला निकाल दिला आहे आणि त्यात असेही म्हटले आहे की त्या व्यक्तीकडे कोणतीही सत्ता असू शकत नाही किंवा एका जागेवर राहू शकत नाही. त्यांनी २०११ मध्ये जे काही सांगितले आहे ते त्यांनी पाळले पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा