जम्मू काश्मीरमधील रियासी येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते. हल्ल्याच्या दरम्यान बस दरीत कोसळली होती. यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडून कारवाईला वेग आला असून सात ठिकाणी शोध घेतला जात आहे. जम्मू- काश्मीरमधील विविध ठिकाणी या प्रकरणाशी संबंधित कारवाई सुरू आहे.
तपास सुरू असलेली ठिकाणेही दहशतवादी आणि ओव्हर- ग्राउंड वर्कर्स यांच्याशी जोडलेली आहेत, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे. एनआयची अनेक पथके शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळपासून राजौरी आणि रियासी जिल्ह्यात शोधमोहीम राबवत आहेत. यापूर्वी ३० जून रोजी, सुरक्षा यंत्रणांनी राजौरीतील दहशतवादी आणि त्यांच्या ओव्हरग्राउंड ऑपरेटिव्हशी संबंधित पाच ठिकाणांवर छापे टाकले होते.
J&K | NIA is conducting searches at seven locations into the case linked to the Reasi bus attack in Jammu and Kashmir. The locations being searched are linked to hybrid terrorists and Over-Ground Workers (OGWs).
— ANI (@ANI) September 27, 2024
हे ही वाचा:
एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त!
हिमाचलचे मंत्री विक्रमादित्यांना काँग्रेसने फटकारले
झाशीच्या राणीच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या वक्फ बोर्डाचा प्रयत्न हाणून पाडला!
संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद, २५ हजारांचा दंड!
कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिरापासून शिव खोरी मंदिराकडे जात असताना यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या ५३ आसनी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस गोळीबारानंतर खोल दरीत कोसळली, त्यात १० जण ठार आणि ४१ जण जखमी झाले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांना सुरक्षित निवारा, रसद आणि अन्न पुरवणाऱ्या हकम खान उर्फ हकीन दिन याला अटक करण्यात आली. त्यानंतर शोधमोहीम राबवून दहशतवाद्यांच्या संबंध दर्शविणाऱ्या विविध वस्तू जप्त करण्यात आल्या.