देशात ठिकठिकाणी चालू केली रुग्णालये
देशावरील कोविडचे संकट गहिरे होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भारतीय सैन्य कोणत्या तऱ्हेने भारतीयांची मदत करत आहे, याबद्दल माहिती देखील घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी याबाब ट्वीट करून माहिती दिली आहे. त्याबरोबरच पंतप्रधानांकडून याबाबत त्यांच्या संकेतस्थाळावर याबाबतचे पत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Reviewed the efforts being taken by the Indian Army in the fight against COVID-19. https://t.co/bulevS6Kvu
— Narendra Modi (@narendramodi) April 29, 2021
हे ही वाचा:
सुनील मानेच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा
टाटा स्टीलचे ऑक्सिजन उत्पादन ८०० टन प्रतिदिनांवर
कोरोना रुग्णांसाठी अजय देवगणकडून १ कोटींची मदत
कांदिवली पूर्वमध्ये नवी लसीकरण केंद्रे द्या; भातखळकरांची मागणी
या बैठकीत भारताचे सैन्य प्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) मनोज म. नरवणे यांनी मोदींना कोविड काळातील सैन्याच्या तयारीबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. जनरल नरवणे यांनी सांगितले की, विविध राज्य सरकारांना सैन्याचे वैद्यकिय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याबरोबरच सैन्य देशातील विविध भागांत तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालये स्थापन करत आहे.
जनरल नरवणे यांनी सांगितले की,सैन्य सामान्य नागरिकांसाठी देखील रुग्णालये स्थापन करत आहे. त्याठिकाणी कोणीही नागरिक उपचारांसाठी जाऊ शकतात.
सैन्याने ऑक्सिजनच्या वहनासाठी आणले जाणारे टँकर्स चालवण्यासाठी विशेष प्रशिक्षित ड्रायव्हर्सच्या रुपाने मदत पुरवली असल्याचे देखील जनरल नरवणे यांनी सांगितले.
सध्याच्या कोविड काळात भारतीय सैन्य मदतील धावले आहे. वायू दल ऑक्सिजन टँकर्सच्या वहनात मदत करत आहे तर, सैन्याने आपल्या निवृत्त डॉक्टरांना कोविडसाठी जवळच्याच रुग्णालयांत पुन्हा एकदा रुजू होण्यास सांगितले आहे.