ब्रेक द चेन मोहिमेचा फज्जा
राज्यात लॉकडाउचे कडक निर्बंध लागू झाल्यानंतर या नियमांचे लसीकरण केंद्रात तीनतेरा वाजल्याचे दिसते आहे. राज्यातील विशेषतः मुंबईतील विविध लसीकरण केंद्रात प्रचंड गर्दी उसळली असून लसी उपलब्ध असल्याचे कळल्यानंतर लोकांनी गर्दी केली आहे. पण ही गर्दी आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे. एकीकडे ब्रेक द चेन हे सूत्र राबविण्याचे धोरण आहे पण या रांगा मात्र ब्रेक करणे सरकारला जमलेले नाही.
सुनील मानेच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा
कांदिवली पूर्वमध्ये नवी लसीकरण केंद्रे द्या; भातखळकरांची मागणी
परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल
आता अमेरिकेकडून ७.४१ अब्ज रुपयांची मदत
मुंबई महानगरपालिकेकडे रात्री उशिरा लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण करण्यात येणार होते. कोव्हिशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला. त्यासाठी बीकेसीतील लसीकरण केंद्र असेल किंवा गोरेगाव येथील नेस्को केंद्र असेल याठिकाणी लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाली. एकूणच व्यवस्थापनातील दिरंगाई आणि निष्काळजीपणाचा फटका लोकांना बसतो आहे.
यासंदर्भात महापौरांनी गर्दी करू नका, असे आवाहन केले आहे पण गर्दीचे व्यवस्थापनच नसल्यामुळे लोक पूर्णपणे संभ्रमात आहेत. काहीठिकाणी किती लसी उपलब्ध आहेत, किती लोकांना दिल्या जातील हे स्पष्ट नाहीत. तरीही मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. या लोकांची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे सकाळपासून लोक रांगेत आहेत. त्यांना बसण्याचीही सोय नसल्यामुळे तासनतास लोक रांगेत उभे आहेत. एकूणच लसीकरणाचे व्यवस्थापन अपयशी ठरल्याचेच दिसते आहे.
ज्यांना मेसेज आले असतील त्यांनीच लसीकरण केंद्रावर या, असे आवाहन करण्यात आले असले तरी ते आवाहन लोकांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, विविध ठिकाणांहून लोकांचे जत्थे लसीकरण केंद्राच्या दिशेने गोळा होत आहेत. लसीकरण केंद्रात किती लस उपलब्ध आहे, एका वेळेला किती लोकांना लस देता येईल, त्याला किती वेळ लागेल, लोकांना कोणत्या वेळेला बोलावता येईल, त्यांचा वेळ कसा वाया जाणार नाही, याची काळजी घेता येईल याचा कोणताही विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या वयोवृद्धांची परवड सुरू आहे.