अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० एप्रिलला घाडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) आणि पोलिस महासंचालक लाचलुचपत विभाग यांना पत्र लिहून परमबीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
अकोल्यातल्या कोतवाली पोलीस ठाण्यात परमवीर सिंग, डीसीपी पराग मणेरे यांच्यासह ३३ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहा आहे. अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा:
सुनील मानेकडे प्रियदर्शनी पार्क ते अँटेलियाचे नकाशे
दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डीला अटक
पुजाऱ्याला थोबाडीत मारणारा मुजोर जिल्हाधिकारी निलंबित
अकोल्यातून गुन्हा दाखल करून तपासासाठी ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची पोलीस अधिक्षकांची माहिती आहे.
पीआय भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. शिवाय काही अधिकारी त्यांना मदत करत होते असेही पत्रात म्हटले आहे.
ठाण्याच्या शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला असे गंभीर आरोप घाडगे यांनी पत्रात केले होते. त्याशिवाय,परमबीर यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार घाडगे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात केली आहे.
या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून, या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.