28 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरक्राईमनामालॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?, सलमान खानच्या वडिलांना महिलेकडून धमकी !

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?, सलमान खानच्या वडिलांना महिलेकडून धमकी !

आरोपी महिलेला अटक

Google News Follow

Related

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमान खानच्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सलमान खानला नाहीतर त्यांचे वडील सलीम खान यांना धमकी देण्यात आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान सलीम खान यांना बुरखा घातलेल्या अनोळखी महिलेने मी लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का?, अधिक धमकी दिली आहे.

ही संपूर्ण घटना १८ सप्टेंबरची आहे. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आले होते. यावेळी स्कूटरवरून आलेल्या महिलेने सलीम खान यांना गाठले आणि लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?, अशी धमकी देत तेथून पळ काढला. महिलेने बुरखा घातला असल्याने ओळख पटली नाही.

हे ही वाचा : 

लेबनॉन स्फोटातील उपकरणे जपानी कंपनीची; उत्पादने २०१४ मध्येचं बंद केल्याचा कंपनीचा दावा

वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात, तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर ?

लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं; पेजर्सनंतर आता रेडिओ, वॉकीटॉकीमध्ये स्फोट

सायन पुलावर दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

यानंतर या अनोळखी महिलेविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने धमकी देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे, जेव्हा घटना घडली तेव्हा महिलेसोबत अन्य एक व्यक्ती होता. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी बुरखा घातलेल्या महिलेलाही ताब्यात घेतले आहे. तिच्यासोबत असलेला व्यक्तीलाही अटक करण्यात आली, तो व्यक्ती किरकोळ गुन्हेगार असल्याची माहिती आहे. हे दोघेही मित्र-मैत्रीण आहेत. बुरखा घातलेल्या महिलेने समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्यासाठी असे कृत्य केल्याचे सध्या पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा