27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषवायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात, तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर ?

वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात, तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर ?

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा

Google News Follow

Related

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्याच्या मागील वायएसआर काँग्रेस (वायएसआरसीपी) सरकारवर मोठा आरोप केला आहे, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात श्री व्यंकटेश्वर मंदिरात ‘प्रसाद’ म्हणून दिले जाणारे तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट घटकांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यानंतर राज्यात राजकीय हल्लाबोल आणि पलटवार सुरू झाले आहेत.

अमरावती येथे एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, वायएसआरसीपी सरकारने जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवताना निकृष्ट घटकांचा वापर केला होता. शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती. नायडू पुढे म्हणाले की, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील सर्व गोष्टींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे गुणवत्ता सुधारली आहे. मात्र, वायएसआरसीने नायडू यांचे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.

एन चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपानंतर आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनीही या मुद्द्यावरून जगन मोहन रेड्डी सरकारवर निशाणा साधला. तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे आमचे सर्वात पवित्र मंदिर आहे. वायएस जगन मोहन रेड्डी प्रशासनाने तिरुपती प्रसादममध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे ऐकून मला धक्का बसला आहे, असे त्यांनी ट्वीटपोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा : 

लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं; पेजर्सनंतर आता रेडिओ, वॉकीटॉकीमध्ये स्फोट

सायन पुलावर दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

धारावीत धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीला चाकुचा धाक दाखवून बलात्कार

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत २५० मोबाईल फोन, २२ सोनसाखळ्यांची चोरी

दरम्यान, वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते आणि टीटीडीचे माजी अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडू यांच्या आरोपांना दुर्भावनापूर्ण म्हटले आहे. रेड्डी म्हणाले की, टीडीपी सुप्रीमो राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला आणि शेकडो कोटी हिंदूंच्या श्रद्धेला हानी पोहोचवून मोठे पाप केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा