28 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरक्राईमनामासायन पुलावर दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

सायन पुलावर दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

Google News Follow

Related

सायन पुलावर बुधवारी पहाटे दोन मोटारसायकल समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सायन पोलिसांनी चुकीच्या दिशेने येणाऱ्या एक्टिव्हा चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनिमेश मोरे (२३) आणि असफाक अन्सारी (२८) असे अपघातात ठार झालेल्याची नावे असून अमोल कुंचिकोर्वी (२०), विग्नेश सरवदे (२०)आणि मेहंदी सय्यद (३०) हे तिघे जण जखमी झाले आहे. त्यापैकी विग्नेश याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनिमेश विग्नेश आणि अमोल हे तिघे विक्रोळी टागोर नगर येथे राहणारे असून असफाक आणि मेहंदी हे दोघे गोवंडी शिवाजी नगर येथे राहणारे आहे.

हे ही वाचा:

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत २५० मोबाईल फोन, २२ सोनसाखळ्यांची चोरी

मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

छे छे, राहुल गांधी दहशतवादी नाहीत…

रशियाच्या संकटातून सुखरूप परतला जम्मू-काश्मीरचा आजाद, पंतप्रधानांचे मानले आभार!

बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास विक्रोळी येथे राहणारे तिघेजण एक्टिव्हा मोटारसायकल वरून गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी विक्रोळी येथून निघाले होते, तर असफाक आणि मेहंदी हे दोघे बेनाली ३०० बाईक वरून मुंबईतील बडी मशिदीतून दर्शन घेऊन शिवाजी नगर येथे घरी निघाले होते. सायन पुलावरून भरधाव वेगाने जात असताना विघ्नेश हा चुकीच्या बाजूने पुलावरून जात असतांना दोन्ही मोटारसायकल समोरासमोर एकमेकाना धडकून अनिमेश हा पुलावरून खाली फेकला गेला, हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघाताची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाचही जखमींना तात्काळ उपचारासाठी सायन रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी अनिमेशला तपासून मृत घोषित केले व चौघांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असता दुपारी असफाक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून विग्नेश याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी चुकीच्या दिशेने गाडी चालविणाऱ्या विग्नेश विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा