28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरक्राईमनामाधारावीत धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीला चाकुचा धाक दाखवून बलात्कार

धारावीत धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीला चाकुचा धाक दाखवून बलात्कार

आरोपी शेजारी असल्याचे तपासात समोर

Google News Follow

Related

धारावीत धक्कादायक घटना समोर आली आहे.मुलीला एकटी पाहून घरात घुसलेल्या ५९ वर्षीय व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी चेहरा मास्कने झाकला होता. धारावी पोलिसांनी हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितेला सायन रुगणालयात दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा पीडितेच्या शेजारीच राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुलगी घरी एकटी असताना ५९ वर्षीय आरोपीने तिच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने हल्ला करून तिच्या मानेला दुखापत केली. चेहऱ्यावर मास्क लावला होता, त्यामुळे मुलगी त्याला ओळखू शकली नाही. मात्र, मुलीने विरोध केल्यावर आरोपीच्या चेहऱ्यावरील मास्क उतरला आणि तिने त्याला ओळखले.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिने आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने आरोपीला ओळखताच आरोपीने तिला धमकी दिली की, याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकेन.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा शांतातपूर्ण, सरासरी ५८ टक्के मतदान !

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत २५० मोबाईल फोन, २२ सोनसाखळ्यांची चोरी

मागाठाणेतून अमित ठाकरेंना मैदनात उतरवण्यासाठी मनविसेने कंबर कसली

मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

मुलीच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी आरोपीने कपाटात दागिने ठेवले आहेत की नाही याची तपासणी केली. मुलीचे कुटुंबीय घरी आल्यावर त्यांनी तिच्या आईला घटनेची माहिती दिली आणि धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर, धारावी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि POCSO कायद्याच्या कलम 66(1) आणि 351(3) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलीची सायन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा