28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेष'हिजाब-बुरखा' घाला नाहीतर बांगलादेश सोडा !

‘हिजाब-बुरखा’ घाला नाहीतर बांगलादेश सोडा !

बांगलादेशात खुलेआम हिंदू मुलींना केले जात आहे लक्ष्य

Google News Follow

Related

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचाराची पेटलेली आग अजूनही काही ठिकाणी धगधगत आहे. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक जातींना लक्ष्य करण्यात आले, विशेषतः हिंदू लोकांना. हसीना शेख यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देताच हिंदू लोकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले. हिंदूची घरे, मंदिरे, लुटमार, हत्या अशा अनेक घटना घडल्याच्या बातम्या, व्हिडीओ समोर आले. अशा प्रकरणांमध्ये अजूनही घट झालेली नाहीये. आता तर हिंदू भगिनी आणि मुलींना खुलेआम धमकावले जात आहे. ‘हिजाब-बुरखा’ घाला नाहीतर बांगलादेश सोडा, अशी धमकी  जमात-ए-इस्लामीचे कट्टरवादी देत आहेत. याचे व्हिडीओ देखील समोर आलेले आहेत.

बांगलादेशाचा कारभार अंतिम सरकार चालवत असून सरकारचे प्रमुख सलाहकार मोहम्मद यूनुस हे आहेत. मात्र, परिस्थिती अजूनही आहे तशीच आहे. अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचारावर मोहम्मद यूनुस मुग गिळून गप्प आहेत, दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. आता नुकताच व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये हिंदू मुलींना ‘हिजाब-बुरखा’ घाला नाहीतर बांगलादेश सोडा, अशी धमकी दिली जात असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा : 

पश्चिम बंगालमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर टाकला ‘लोखंडी पत्रा’

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी

तो ज्यूस मध्ये मिसळत होता ‘मानवी मूत्र’

पंतप्रधानांकडून झारखंड, ओडिशा, बिहार, यूपीसाठी ६ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा !

आणखी एका व्हिडीओमध्ये भर बाजारात एका हिंदू मुलीला उठाबशा काढायला लावत असल्याचे दिसत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात इस्लामी कट्टरवादी घोळका करून हातामध्ये लाकडी दांडुका घेवून तरुणीला मारहाण करत उठाबशा काढायला लावत आहेत, यावेळी अन्य लोक या घटनेचे व्हिडीओ काढत आहेत.

तसेच आणखी एका व्हिडीओ महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. व्हिडीओत महिला हात जोडून विनवणी करत आहेत, मात्र, कट्टरवादी तिला मारहाण करत आहेत. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. भारत सरकारने अशा घटना रोखण्यासाठी पाऊले उचलावीत असे आवाहन अनेक नेटकरी सोशल मिडीयावर करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा