पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये आज सकल हिंदू समाज एकवटला. ज्ञानेश महाराव विरोधात निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो हिंदू समाजबांधव सहभागी झाले होते. महाराव यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी समाजाच्यावतीने करण्यात आली.
तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल तसेच स्वामी समर्थ यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या सकल हिंदू समाजाने आज निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेड या संघटनेने आपल्या फ्लेक्सवरून छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो काढावा, अशी मागणीही करण्यात आली.
हेही वाचा..
ख्रिश्चन धर्मीयांकडून गणपती विसर्जनाच्या वाटेत ‘मिरचीची धुरी’
सत्ता आल्यास एक तासात दारूबंदी रद्द करणार
‘क्रिकेटचा फिवर शरीयाच्या विरोधात, तालीबान्यांकडून क्रिकेट बंदीची शक्यता’
चंदीगड ग्रेनेड स्फोट: दिल्लीतून दुसऱ्या आरोपीला अटक !
ज्ञानेश महाराव यानी प्रभू राम किंवा स्वामी समर्थ यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद असे वक्तव्य केले आहे. यातून त्यांना हिंदू समाजात फुट पडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निषेध म्हणून राजगुरूनगर मधील सकल हिंदू समाजाने आज मार्केट यार्ड ते भाजी मंडई या मार्गावरून निषेध रॅली काढली. या रॅलीत हाजारो पुरुष, महिला, तरुण सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना डॉ. सचिन बोधनी म्हणाले, ज्ञानेश महाराव यानी तमाम हिंदूंचा अपमान केला आहे. त्यांनी अशी विधाने भारतात केली की जो देश हिंदुंचा आहे. त्यांना तातडीने अटक करावी.
त्याच प्रमाणे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपले बलिदान दिले. त्या छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या फ्लेक्सवर लावू नये, कारण संभाजी ब्रिगेड या संघटनेचे काम छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने महाराजांचा फोटो काढावा, असे ते म्हणाले. यावेळी नितीन वाटकर यांचे भाषण झाले. आभार अमित खेडकर यांनी मानले.