28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेष१६ वर्षांखालील मुलांना ऑस्ट्रेलियात 'सोशल मीडियाबंदी'

१६ वर्षांखालील मुलांना ऑस्ट्रेलियात ‘सोशल मीडियाबंदी’

पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

सोशल मीडिया हा आजच्या युगातील महत्त्वाचा भाग बनला आहे. सोशल मीडियावर जगभरातील माहिती उपलब्ध आहे. बातम्या असो वा मनोरंजन, हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इंटरनेटवर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करत आहेत.

सोशल मिडीयाच्या लहान मुलांच्या वापरावर योग्य मानले जात नाही, मात्र जगभरात लहान मुलांकडून वापर केला जात आहेत. सोशल मीडियाच्या सकारात्मक पैलूंसोबतच नकारात्मक पैलूही आहेत आणि त्याचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याची योजना आखण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी (१० सप्टेंबर?) १६ वर्षांखालील मुलांना सोशल मिडीयाच्या वापरावर बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा केली. अल्बानीज म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस मुलांकडून सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी संसदेत कायदा लागू केला जाईल.

हे ही वाचा : 

अमेरिकेत चीनची भांडी घासतायत राहुल गांधी…

उमर गौतमसह १४ जणांची धर्मांतरणाची टोळी दोषी !

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनाच लाल चौकात जाण्याची भीती वाटत असे!

हरियाणा निवडणुकीसाठी भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर !

सोशल मीडियामुळे तरुण मुलांवर होणाऱ्या परिणामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. Facebook, Instagram आणि TikTok सारख्या साइट्सवर लॉग इन करण्यासाठी मुलांचे किमान वय निश्चित केलेले नाही परंतु ते १४ ते १६ वर्षांच्या दरम्यान असावे, असे अल्बानीज यांनी सांगितले.

अल्बानीज म्हणाले, मला मुलांना मैदानावर, स्विमिंग पूल्स आणि टेनिस कोर्टवर पहायचे आहे. त्यांनी खऱ्या लोकांसोबत वास्तविक अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा आहे, कारण सोशल मीडियामुळे सामाजिक नुकसान होत असल्याचे  आम्हाला माहित आहे.दरम्यान,  ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, ६१ टक्के ऑस्ट्रेलियन लोकांनी १७ वर्षांखालील लोकांसाठी सोशल मीडियाचा प्रवेश प्रतिबंधित करण्याचे समर्थन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा